झोपेत बडबडायचा नवरा, पुरावा देण्यासाठी बायकोने लावला कॅमेरा, पण कैद झालं असं दृश्य बसला धक्का
- Published by:Priya Lad
Last Updated:
Sleep Talking : बिली आणि त्याच्या पत्नीने त्यांच्या रात्रीच्या अॅक्टिव्हिटी रेकॉर्ड करण्यासाठी बेडरूममध्ये कॅमेरा बसवण्याचा निर्णय घेतला. या कॅमेऱ्याने बिलीच्या झोपेच्या अनोख्या जगाचा उलगडा केला.
नवी दिल्ली : झोपेत बोलणं किंवा बडबडणं, अनेकांना या समस्येचा त्रास होतो. हे कोणत्या धोक्याचं लक्षण आहे का किंवा कोणत्याही मोठ्या आजाराचं लक्षण आहे का? सहसा असं घडत नाही पण त्यामुळे काही प्रकारचा धोका निर्माण होऊ शकतो. केवळ सावधगिरीमुळे होणारे अपघात टाळता येतात. असाच झोपेत बडबडणाऱ्या एका व्यक्तीसोबतही एक दुर्दैवी अपघात थोडक्यात टळला.
अमेरिकेच्या फ्लोरिडातील ही घटना आहे. टाम्पा बे इथं राहणारा 49 वर्षीय बिलीला 18 वर्षांपूर्वी कळलं की तो झोपेत बडबडतो. त्या काळात त्याच्या बायकोने त्याला रात्री उठवलं आणि सांगितलं की तो बराच वेळ बोलतो. सुरुवातीला त्याने इतर लोकांप्रमाणे ते हलक्यात घेतलं. एके दिवशी बिलीने चुकून झोपेत त्याच्या बायकोच्या डोक्यावर दुखापत केली.
advertisement
तीन वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतरच बिली आणि त्याच्या पत्नीने त्यांच्या रात्रीच्या अॅक्टिव्हिटी रेकॉर्ड करण्यासाठी बेडरूममध्ये कॅमेरा बसवण्याचा निर्णय घेतला. या कॅमेऱ्याने बिलीच्या झोपेच्या अनोख्या जगाचा उलगडा केला.
बिलीने काय केलं?
बिलीने झोपेत त्याच्या आईला फोन केला आणि शार्कपासून पळून जाण्याबद्दल बोलत होता. याशिवाय, तो त्याच्या पत्नीशी बराच वेळ गप्पा मारत असे. तो म्हणतो, "बहुतेक वेळा मी मूर्खपणाच्या गोष्टी करतो. शार्क माझा पाठलाग करत आहे असं मला वाटतं. अलीकडेच मी झोपेत माझ्या आईला फोन केला आणि विचारलं की आपण लग्नाला जायचं आहे का? एकदा मी खिडकीतून ओरडायला सुरुवात केली, मला वाटलं की माझी मुलगी अंगणात फटाके वाजवत आहे. मी गाडी चालवण्याशिवाय सर्व काही केलं आहे."
advertisement
त्याच्या सध्याच्या पत्नीशी लग्न होऊन आठ वर्षे झाली आहेत. ती नेहमी म्हणायची की बिली झोपेत विचित्र गोष्टी करतो. कॅमेऱ्यातून रेकॉर्डिंग पाहून बिलीला धक्का बसला. तो म्हणाला, "जेव्हा मी स्वतःला पाहिलं तेव्हा मला हसू आवरता आलं नाही. पण मला विश्वासच बसत नव्हता की तो मीच आहे. विशेष म्हणजे मी झोपेत काय केलं याबद्दल काहीही आठवत नाही."
advertisement
आता बिलीच्या झोपेतल्या कृत्यांमुळे त्याच्या कुटुंबाचे मनोरंजन झालं आहे. जेव्हा जेव्हा नातेवाईक येतात तेव्हा सर्वजण टीव्हीसमोर जमतात आणि रात्री बिलीच्या कृत्यांवर हसतात. ही समस्या झोपेचा विकार आहे, जी पार्किन्सन आजाराचं लक्षण असू शकतं.
Location :
Delhi
First Published :
August 06, 2025 9:30 AM IST
मराठी बातम्या/Viral/
झोपेत बडबडायचा नवरा, पुरावा देण्यासाठी बायकोने लावला कॅमेरा, पण कैद झालं असं दृश्य बसला धक्का