Navi Mumbai : बुटात बसला होता भलामोठा किंग कोब्रा! सुरक्षारक्षकाने पाय घातला अन्...., नवी मुंबईतील घटनेनं खळबळ!

Last Updated:

King Cobra: नवी मुंबईतील म्हापे एमआयडीसीत चक्क सुरक्षारक्षकाच्या बुटात किंग कोब्रा आढळला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली.

King Cobra: बुटात बसला होता भलामोठा किंग कोब्रा! सुरक्षारक्षकाने पाय घातला अन्...., नवी मुंबईतील घटनेनं खळबळ!
King Cobra: बुटात बसला होता भलामोठा किंग कोब्रा! सुरक्षारक्षकाने पाय घातला अन्...., नवी मुंबईतील घटनेनं खळबळ!
नवी मुंबई: नवी मुंबईतील म्हापे एमआयडीसीमधील एका कंपनीत काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाच्या बुटात भलामोठा किंग कोब्रा आढळला. सुरक्षारक्षक केबिनबाहेर ठेवलेले बूट घालताना त्याच्या बुटात हालचाल जाणवली. बुटात साप पाहिल्यानंतर लगेच सर्पमित्राला बोलावण्यात आले. सर्पमित्राने सापाला पकडून जंगलात सोडले. मात्र हा साप साधासुधा नसून सर्वात विषारी मानला जाणारा किंग कोब्रा असल्याचे सांगितले. त्यानंतर परिसरात मोठी खळबळ माजली. सुरक्षारक्षकाला सुदैवाने कुठलीही इजा झालेली नाही.
नेमकं घडलं काय?
म्हापे एमआयडीसीमधील एका कंपनीत काम करणाऱ्या सुरक्षारक्षकाने आपले बूट पाऊस सुरू असल्याने केबिनच्या बाहेर काढले होते. त्याने पुन्हा बूट घालण्याचा प्रयत्न केला. मात्र बुटात हालचाल जाणवली. तेव्हा त्याने बुटात पाहिले असता एक साप दिसला. यानंतर सुरक्षारक्षकाने ताबडतोब सर्पमित्र अक्षय डांगे यांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. अक्षय यांनी सापाला पकडून जंगलात सोडून दिले. परंतु, बुटात असणारा साप सर्वात विषारी किंग कोब्रा असल्याचे लक्षात येताच सर्वांची घाबरगुंडी उडाली.
advertisement
सर्वाधिक विषारी किंग कोब्रा
दरम्यान, किंग कोब्रा हा जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक आहे. मुख्यतः भारत, दक्षिण-आशिया, दक्षिण-पूर्व आशिया आणि फिलिपाइन्स भागात हा साप आढळतो. अत्यंत सतर्क आणि बुद्धिमान सापांपैकी एक म्हणून किंग कोब्राला ओळखलं जातं. एका दंशात किंग कोब्रा इतकं विष सोडतो की त्याच्यात एकाच वेळी 20 हत्तींना मारण्याची ताकद असते. त्यामुळेच किंग कोब्राला सापांच्या जगातील राजा मानलं जातं, आणि त्यामुळेच त्याला किंग कोब्रा नाव असल्याचं सांगितलं जातं.
मराठी बातम्या/Viral/
Navi Mumbai : बुटात बसला होता भलामोठा किंग कोब्रा! सुरक्षारक्षकाने पाय घातला अन्...., नवी मुंबईतील घटनेनं खळबळ!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement