Viral Video - तुफान व्हायरल होतेय ही Raksha Bandhan Mehndi design; साधीसुधी नाही आहे खूप खास
- Published by:Priya Lad
Last Updated:
रक्षाबंधनसाठी या खास मेहंदीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट : रक्षाबंधनसाठी बहिणींनी आपल्या हातांवर रक्षाबंधन स्पेशल मेहंदी डिझाईन काढल्या असतील. अशाच रक्षाबंधन मेंदी डिझाइनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ही मेहंदी साधीसुधी नाही खूप खास आहे. सर्व डिझाईनपेक्षा थोडी हटके आहे. किंबहुना अशी डिझाइन तुम्ही आजवर कधीच पाहिली नसेल.
रक्षाबंधनसाठी तुम्ही हटके मेहंदी डिझाइन शोधत असाल तर ही डिझाइन जबरदस्त आहे. ही मेहंदी खूप स्पेशल आहे. कारण यामुळे तुमच्या हातावर रंग तर चढेलच पण सोबतच तुम्हाला तुमच्या भावाकडून रक्षाबंधन गिफ्टही मिळेल. असं या मेहंदीत काय आहे ते पाहुयात.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता हाताच्या मागच्या बाजूला काढलेली ही मेहंदी. एक क्युआर कोडसारखी ही डिझाइन. एक तरुणी हा मेहंदीचा क्युआर कोड मोबाईलमधील यूपीआय अॅपवरून स्कॅन करते आणि चक्क तो स्कॅन होतो. आता यात फक्त पैसे टाकायचे आणि पैसे ट्रान्सफर. सामान्यपणे रक्षाबंधनला प्रेझेंट पाकिटात पैसे टाकून ते बहिणीला ओवाळणी म्हणून दिले जातात. पण आता फक्त बहिणीने हा क्युआर कोडवाला मेहंदीचा हात पुढे करायचा तो भावाने स्कॅन करून त्यात पैसे टाकले की ती ओवाळणी बहिणीला गेली. ही डिजीटल मेहंदी आहे.
advertisement
इन्स्टाग्रामवर यश_मेहंदी नावाच्या पेजवर डिजिटल मेहंदीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. पण खरंच हे शक्य आहे का? तर नाही याच व्हिडीओत खाली ते स्पष्ट करण्यात आलं आहे. हा व्हिडीओ फक्त मनोरंजनासाठी आहे. तो एडिट करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
advertisement
advertisement
तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Delhi
First Published :
Aug 29, 2023 10:22 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Viral Video - तुफान व्हायरल होतेय ही Raksha Bandhan Mehndi design; साधीसुधी नाही आहे खूप खास









