Weird Food : हिवाळ्यात खरंच सापाचं सूप पितात चीनचे लोक? यामागे आहे एक विचित्र कारण
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
तुम्हाला माहित आहे का की जगात असा एक देश आहे जिथे लोक सापांना घाबरणं तर दूरच पण ते त्यापासून सूप बनवून पितात. सहसा लोक चिकन सूप पितात, पण इथले लोक स्नेक सूप पितात.
नवी दिल्ली 05 डिसेंबर : साप जगातील सर्वात धोकादायक जीवांमध्ये गणले जातात, कारण त्यांच्या काही प्रजाती अत्यंत विषारी आहेत. एवढ्या विषारी की ते चावले तर क्षणार्धात माणूस मरू शकतो. असे अनेक साप आहेत, ज्यांच्या विषाचा एक थेंबही शेकडो लोकांचा जीव घेऊ शकतो. त्यामुळे बहुतेक लोक सापांना घाबरतात, परंतु तुम्हाला माहित आहे का की जगात असा एक देश आहे जिथे लोक सापांना घाबरणं तर दूरच पण ते त्यापासून सूप बनवून पितात. सहसा लोक चिकन सूप पितात, पण इथले लोक स्नेक सूप पितात. या देशाचं नाव चीन आहे.
रिपोर्टसनुसार, काही दिवसांपूर्वीच पिझ्झा हट आणि हाँगकाँगमधील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या 'स्नेक रेस्टॉरंट'मधील एक सेर वोंग फनने लॉन्च केलेल्या स्नेक-सूप पिझ्झाने खूप खळबळ उडवून दिली होती. अनेकांना ते पाहून आश्चर्य वाटलं होतं. ते खाणं सुरक्षित आहे का नाही आणि त्याची चव कशी असेल? असा प्रश्न अनेकांना पडला होता. असं म्हटलं जात आहे, की ही एक कँटोनीज डिश आहे, जी चीनमध्ये विशेषतः हिवाळ्याच्या काळात खूप लोकप्रिय आहे.
advertisement
लोकांचं म्हणणं आहे, की जेव्हा सापाचं सूप योग्य प्रकारे तयार केलं जातं तेव्हा ते विचित्र दिसत नाही. तसंच त्याची चव किंवा वास विचित्र येत नाही. तज्ज्ञांच्या मते, सापाचे सूप दक्षिण चीनमध्ये हजारो वर्षांपासून पाककृतीचा एक भाग आहे. ही रेसिपी जियांग कॉंग्यिन (1864-1952) यांनी लोकप्रिय केली होती, जे किंग राजवंशातील शेवटच्या शाही विद्वानांपैकी एक आणि ग्वांगझूचे मूळ रहिवासी होते. त्यावेळी, स्नेक सूपने ग्वांगडोंग प्रांतातील सर्वोत्कृष्ट स्वादिष्ट पदार्थाचा किताब जिंकला होता. आरोग्याच्या दृष्टीकोनातून हे खूप फायदेशीर मानलं जातं.
advertisement
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, सेर वोंग फन रेस्टॉरंटचे चौथ्या पिढीचे मालक गिगी एनजी म्हणाले, 'हान राजवंशाच्या काळापासून साप आरोग्यासाठी चांगला मानला जात आहे, कारण अनेक महत्त्वाच्या चिनी वैद्यकीय सूत्रांमध्ये त्याचा वापर केला जातो.' स्नेक सूप जीवनसत्त्वं आणि प्रथिनांनी समृद्ध असल्याचं म्हटलं जातं. यामुळे झोप चांगली येते आणि कर्करोग रोखणं यासह आरोग्याला अनेक फायदे मिळतात, असा दावा केला जातो
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 05, 2023 8:02 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Weird Food : हिवाळ्यात खरंच सापाचं सूप पितात चीनचे लोक? यामागे आहे एक विचित्र कारण


