लव्ह मॅरेज केलं, बायकोला शिकवलं, पण सरकारी नोकरी लागताच तिनं पतीला सोडलं, धक्कादायक घटना
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
सुतारकाम करणाऱ्या या तरुणाने प्रेमविवाह केला होता. त्याने आपल्या मजूरी करुन शिकवले. यानंतर आता काही काळापूर्वी त्याच्या पत्नीला सरकारी नोकरी लागली. पत्नीला सरकारी नोकरी लागताच तिने आपल्या पतीची साथ सोडली.
शाश्वत सिंह, प्रतिनिधी
झाशी : गेल्या काही दिवसात अनैतिक संबंधांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. याच अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या, तसेच लैंगिक अत्याचाराच्याही घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशातील पीसीएस अधिकारी ज्योती मौर्या प्रकरण समोर आले होते. ज्योती मौर्या यांना त्यांच्या पत्नीने अधिकारी होण्यापर्यंत पूर्ण पाठिंबा दिला. मात्र, अधिकाऱ्या झाल्यानंतर त्यांनी पतीला सोडून दुसऱ्या एका व्यक्तीसोबत नाते जोडले, अशी माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.
advertisement
सुतारकाम करणाऱ्या पतीने आपल्या पत्नीला शिकवले. तिला लेखपाल पदापर्यंत पोहोचवले. मात्र, आता ती लेखपाल पदापर्यंत पोहोचताच तिने आपल्या पतीला सोडचिठ्ठी दिली. झाशीतल्या या घटनेची आता सर्वत्र चर्चा होत आहे.
पतीने केला हा दावा -
सुतारकाम करणाऱ्या या तरुणाने प्रेमविवाह केला होता. त्याने आपल्या मजूरी करुन शिकवले. यानंतर आता काही काळापूर्वी त्याच्या पत्नीला सरकारी नोकरी लागली. पत्नीला सरकारी नोकरी लागताच तिने आपल्या पतीची साथ सोडली. इतकेच नव्हे तर त्याच्यासोबत लग्न झाल्याबाबतही नकार दिला. आता आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी या तरुणाने केली आहे.
advertisement
पत्नीला चावला साप, पतीनं सापाला बादलीत टाकत रुग्णालयात घेतली धाव, नेमकं काय घडलं?
नीरज विश्वकर्मा असे या तरुणाचे नाव आहे. तर ऋचा असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. नीरज कुमार हा सुतारकाम करतो. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी दोघांनी ओरछा येथील रामराजा मंदिरात लग्न केले. लग्नाचे फोटो आणि व्हिडिओही त्याच्याकडे आहे. पत्नीने लग्नानंतर पुढील शिक्षण घ्यायची इच्छा व्यक्त केल्यावर नीरजने तिला पूर्ण पाठिंबा दिला आणि तिचे शिक्षण पूर्ण केले. आता ती लेखपाल पदापर्यंत पोहोचली. मात्र, तिने सरकारी नोकरी लागताच पतीची साथ सोडली.
advertisement
घरातून झाली गायब -
दरम्यान, 18 जानेवारी रोजी पत्नी त्याच्या घरातून अचानक गायब झाली होती. अनेक दिवस त्याने तिचा शोध घेतला. तसेच कौटुंबिक न्यायालयात हे प्रकरण आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नवनियुक्त लेखपालांना नियुक्तीपत्र दिले जात आहे. त्यामळे तो आपल्या पत्नीला भेटायला याठिकाणी आला. आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी त्याने जिल्हाधिऱ्यांकडे केली आहे. या घटनेनंतर ज्योती मौर्या पार्ट 2 अशी चर्चा लोकं करत आहेत.
Location :
Jhansi,Uttar Pradesh
First Published :
July 11, 2024 12:37 PM IST
मराठी बातम्या/Viral/
लव्ह मॅरेज केलं, बायकोला शिकवलं, पण सरकारी नोकरी लागताच तिनं पतीला सोडलं, धक्कादायक घटना