आधी सोयाबीन, मग कपाशी आणि तूर... पिकांवरील किड्यांच्या वाढता प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
- Published by:Devika Shinde
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांचे आधीच सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. अशातच आता तूर पिकावर सुद्धा अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
प्रगती बहुरुपी-प्रतिनिधी, अमरावती : अमरावती जिल्ह्यात यावर्षी शेतकऱ्यांना सततच्या पावसामुळे आणि पिकांवरील रोग-कीड प्रादुर्भावामुळे मोठा फटका बसला आहे. आधी पावसाने सोयाबीनचे नुकसान केले, त्यानंतर सोयाबीनला अपेक्षित भावही मिळाला नाही. सोयाबीनचे संकट संपते न संपते, तोच कपाशीवर दाहिया रोगाचा प्रादुर्भाव झाला, ज्यामुळे शेतकरी हवालदिल झाले.
यापार्श्वभूमीवर, आता शेतकऱ्यांना तूर पिकाकडून काही अपेक्षा होती; परंतु वरुड तालुक्यातील काही भागात तुरीच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले आहे.
अमरावतीतील राजुरा बाजार येथील शेतकरी रविंद्र काकडे यांनी लोकल18शी संवाद साधला आणि त्यांची परिस्थिती मांडली. “मी दरवर्षी 20 एकरात कपाशी, सोयाबीन, तूर, संत्रा, मिरची असे विविध पिके घेतो. पण यंदा सगळीकडे नुकसानच झालं आहे. तुरीवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे, फवारणी करत असूनही तो आटोक्यात येत नाही. आता तुरीला उदळीचा त्रासही होतो आहे. झाडं मोठी झाल्यावर त्यांचे खोड सोकून गळून पडत आहेत," अशी शेतकऱ्याची व्यथा आहे.
advertisement
त्यामुळे काकडे यांच्यासारख्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत चालली आहे. “निसर्गानं साथ दिली तर शेतकऱ्यांपेक्षा सुखी कोणी नाही, मात्र साथ दिली नाही तर शेतकऱ्यांचे हाल बघवत नाहीत,” असे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे म्हणून कृषितज्ज्ञांनाही बोलावले जाते, पण त्यांचा सहकार्याचा अभाव जाणवतो, असे ते सांगतात.
view commentsLocation :
Amravati,Amravati,Maharashtra
First Published :
November 04, 2024 4:26 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
आधी सोयाबीन, मग कपाशी आणि तूर... पिकांवरील किड्यांच्या वाढता प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

