पावसामुळे मोठं नुकसान, दिवाळीत सोयाबीनचे दर कडाडणार? पुढील १५ दिवस मार्केट कसं असणार?

Last Updated:

Soybean Market : राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि अस्थिर हवामानामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.विशेषतः सोयाबीन पिकाला याचा सर्वाधिक फटका बसला असून, अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत किंवा कुजून नष्ट झाली आहेत.

Soybean Market
Soybean Market
मुंबई : राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि अस्थिर हवामानामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः सोयाबीन पिकाला याचा सर्वाधिक फटका बसला असून, अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत किंवा कुजून नष्ट झाली आहेत. सध्या बाजारात सोयाबीनला प्रति क्विंटल सरासरी ३,५०० रु ते ४,००० रु दर मिळत आहे. मात्र, दिवाळी तोंडावर असताना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्टपणे दिसत आहे. “दिवाळी कशी साजरी करायची?” हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
काढणी सुरू, पण उत्पन्न घटले
राज्यात काही भागांमध्ये सोयाबीनची काढणी सुरू झाली असून, काही ठिकाणी अजूनही उरलेले पीक शेतकरी हाताशी लावत आहेत. पण अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट झाली आहे. बहुतांश ठिकाणी १० ते ३० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणे कठीण झाले आहे.
भावात घट आणि अस्थिरता
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत या वर्षी सोयाबीनच्या दरात घट पाहायला मिळत आहे. मागील तीन वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील सरासरी दर पुढीलप्रमाणे होते.
advertisement
ऑक्टोबर २०२२ : ५,०७१ रु प्रति क्विंटल
ऑक्टोबर २०२३ : ४,६६० रु प्रति क्विंटल
ऑक्टोबर २०२४ : ४,३६९ प्रति क्विंटल
या वर्षी, म्हणजे ऑक्टोबर २०२५ मध्ये सोयाबीनचे भाव ४,५१५ रु ते ४,८९५ रु प्रति क्विंटल इतके राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बाजार समित्यांतील आवक आणि व्यापाऱ्यांचा कल पाहता दिवाळीपर्यंत मोठ्या वाढीची शक्यता नसल्याचे दिसते.
advertisement
मागणी स्थिर
भारतातील सोयाबीन उत्पादनात या वर्षी सुमारे १३ टक्क्यांनी घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सन २०२५-२६ हंगामात देशात अंदाजे ११६ लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. दरम्यान, किमान आधारभूत किंमत (MSP) ५,३२८ रु प्रति क्विंटल निश्चित करण्यात आली आहे. परंतु सध्या बाजारभाव हा MSP पेक्षा जवळपास १,००० रु ने कमी आहे.
advertisement
दिवाळीनंतर दरात सुधारणा शक्य आहे का?
सोयाबीनचे प्रमुख उत्पादन राज्ये म्हणजे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या भागांमध्ये अजूनही काही ठिकाणी काढणी प्रलंबित आहे. काढणी पूर्ण झाल्यावर आणि साठा बाजारात आल्यावर दर काही काळ स्थिर राहतील, परंतु नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून थोडी सुधारणा होण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
पावसामुळे मोठं नुकसान, दिवाळीत सोयाबीनचे दर कडाडणार? पुढील १५ दिवस मार्केट कसं असणार?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement