TRENDING:

कशी करावी विवाह नोंदणी? काय लागतात कागदपत्रे? जाणून घ्या प्रक्रिया

Last Updated:

विवाह नोंदणी करण्यासाठी मुलीचं वय कमीतकमी 18 वर्ष पूर्ण आणि मुलाचं वय कमीतकमी 21 वर्ष पूर्ण लागतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमिता शिंदे, प्रतिनिधी
advertisement

वर्धा: भारतात विविध धर्म आणि जातींनुसार विवाहाची पद्धत भिन्न आहे. हे विवाह धार्मिक रिती रिवाजानुसार संपन्न होतात. मात्र, कोणत्याही विवाहाची नोंदणी आवश्यक असते. आपण 'मॅरेज रजिस्टर केलंय किंवा करायचं आहे' असं म्हटलेलं आपण ऐकलं असेल. पण हीच विवाह नोंदणी का गरजेची असते? त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात? याबाबत अनेकांना माहिती नसते. याचसाठी वर्धा येथील वकील तृप्ती रोटकर यांनी माहिती दिली आहे.

advertisement

अशी असते प्रक्रिया

विवाह नोंदणी करण्यासाठी मुलीचं वय कमीतकमी 18 वर्ष पूर्ण आणि मुलाचं वय कमीतकमी 21 वर्ष पूर्ण लागतं. रितींनुसार लग्न झाल्यानंतर मॅरेज कधीही रजिस्टर करता येतं. पहिल्यांदा रजिस्टर ऑफीसमध्ये जाऊन आपल्याला 30 दिवसांची नोटीस द्यावी लागते. त्यासाठी वधू वराचे आधार कार्ड तिथे जमा करावे लागतात. त्यानंतर 30 दिवसांसाठी ऑनलाईन नोटीस निघते. 30 दिवस झाल्यानंतर 31 व्या दिवशी मुलगा आणि मुलगी आणि दोघांच्या आईवडीलांचे आधार कार्ड आणि दोघांचेही फोटो, तसेच 3 साक्षीदार लागतात. तिन्ही साक्षीदारांचे आधार कार्ड आणि फोटो, असं सगळं घेऊन विवाह नोंदणीसाठी जावं लागतं. त्यानंतरच विवाह नोंदणी होते.

advertisement

शेकडो वर्षांपासून या गावात लग्नच होत नाही, पाहा काय आहे परंपरा?

पहिल्यांदा दिलेली नोटीस रजिस्टर ऑफिसच्या बोर्डवर लावली जाते. त्यावर कुणाचा आक्षेप असेल तर ते त्याठिकाणी नोंदवू शकतात. 30 दिवसांच्या आत आक्षेप न आल्यास रजिस्टर ऑफीसकडून नोटीस येते. त्यानुसार ज्या दिवशी बोलावले आहे तेव्हा वधू-वर आणि नातेवाईकांनी ओळखीच्या प्रमाणपत्रासह कार्यालयात जाणे गरजेचे असते. सर्व साक्षीदारांसमोर दोघांच्या सह्या घेऊन विवाहाची नोंदणी होते.

advertisement

विवाह नोंदणीचा फायदा काय?

विवाह नोंदणी आता ऑनलाईनही केली जाते. त्याचा नोंदणी क्रमांक आणि प्रमाणपत्रही दिलं जातं. मॅरेज सर्टिफिकेट महत्त्वाचं कागदपत्र आहे. विविध कारणांसाठी त्याची आवश्यकता असते. मुलीचं नवीन आधारकार्ड तयार करणं, वारसा हक्क आदींसाठी मॅरेज सर्टिफिकेटची गरज असते. रजिस्टरमध्ये नोंद असल्याचे मॅरेज सर्टिफिकेट चुकून हरवलं तरी पुन्हा मिळू शकतं.

advertisement

लग्न जुळण्यात अडचणी येतात, मनासारखा जोडीदार मिळतच नाहीये? काळजी नको, यावर उपाय आहे!

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं धाडस दाखवलं, केली बोरांची शेती, वर्षाला 3 लाखांचं उत्पन्न
सर्व पहा

विवाह प्रमाणपत्र हा सरकारी दस्तऐवज असतो. त्यामुळे भविष्यात कोणतीही अडचण आल्यास विवाहाचा प्रमुख पुरावा म्हणून या कागदपत्राला ग्राह्य मानलं जातं. पासपोर्ट, व्हिसा आणि इतर सरकारी कागदपत्रांसाठी विवाहाचा दाखला असल्यास हा विवाह अधिकृत मानला जातो. त्यामुळे सर्वांनी विवाह नोंदणी करणं गरजेचं असतं.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
कशी करावी विवाह नोंदणी? काय लागतात कागदपत्रे? जाणून घ्या प्रक्रिया
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल