सूप बनवण्यासाठी साहित्य
सर्वप्रथम मंचाऊ सूप तयार करण्यासाठी तुम्हाला भरपूर भाज्या लागणार आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता. यामध्ये गाजर, शिमला मिरची, कांद्याची पात, पत्ताकोबी, त्यासोबतच बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली अद्रक आणि बारीक चिरलेली लसूण हे साहित्या लागेल. तसेच सोया सॉस, काळी मिरची पावडर, टोमॅटो सॉस, तेल हे साहित्यही गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सूप बनवण्यासाठी आपल्याला नाचणीचं पीठ आवश्यक आहे.
advertisement
खरंच चहा पिल्याने चेहरा काळा पडतो का ? आहार तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती
कशी आहे रेसिपी?
तुम्ही हे सुप किती लोकांसाठी करतात त्यानुसार तुम्हाला प्रमाण ठरवायचं आहे. एक चमचा नाचणीच्या पिठासाठी तुम्हाला एक वाटी पाणी घ्यायचं आहे. सर्वप्रथम नाचणीचे पीठ हे छान भाजून घ्यायचं आहे. थोडसं हलकसं ब्राऊन होईपर्यंत भाजायचं. त्यानंतर कढईमध्ये तेल घ्यायचं. त्या तेलामध्ये सुरुवातीला लसूण, अद्रक, हिरवी मिरची टाकून भाजून घ्यायचं. त्यानंतर बारीक चिरलेल्या सर्व भाज्या टाकायच्या. त्याही हळूहळू भाजून घ्यायच्या. भाज्या चांगल्या भाजल्या की त्याच्यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आणि त्याला उकळी येऊ द्यायची.
कॅन्सरवर मात करण्यासाठी मांसाहार करावा का? तुमच्या प्रश्नाचं इथं उत्तर
भाजलेल्या पिठामध्ये थोडं पाणी घालून ते पीठ एकत्र छान मिक्स करून घ्यायचं. उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये हे पीठ घालायचं. त्यानंतर एका वाटीसाठी तुम्ही एक चमचा काळीमिरी पावडर तुमच्या आवडीनुसार त्यासोबत एक चमचा टोमॅटो सॉस आणि चवीनुसार मीठ घालायचं. त्याला एक छान उकळी येऊ द्यायची. त्यानंतर वरून त्याला गार्निशिंगसाठी कांद्याची पात टाकावी. जर तुमच्याकडे तळलेले नूडल्स असतील तर ते सुद्धा तुम्ही गार्निशिंगसाठी वापरू शकता, असं तल्हार सांगतात.