TRENDING:

जालन्यात कोतवाल भरतीसाठी 6 जुलैला फेरपरीक्षा, प्रत्येक केंद्रावर CCTV कॅमेरा!

Last Updated:

जालना जिल्ह्यात 69 रिक्त कोतवाल पदं भरण्यासाठी तालुका निवड समितीकडून एकत्रित परीक्षा घेण्याचं ठरलं आहे. त्यानुसार 6 जुलै रोजी 14 केंद्रांवर ही परीक्षा होईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नारायण काळे, प्रतिनिधी
प्रत्येक केंद्रावर उमेदवाराची तपासणी होईल.
प्रत्येक केंद्रावर उमेदवाराची तपासणी होईल.
advertisement

जालना : जिल्ह्यातील एकूण 69 कोतवाल पदांसाठी लोकसभा निवडणुकीआधी परीक्षा झाली होती, मात्र या परीक्षेत गैरप्रकार आढळून आल्यानंतर ती रद्द करण्यात आली. त्यामुळे पुन्हा परीक्षा घेण्याची जोरदार मागणी होत होती. याचीच दखल घेऊन ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, त्यांची आता 6 जुलै रोजी 3.30 ते 5 या वेळेत फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे.

advertisement

जालना जिल्ह्यात 69 रिक्त कोतवाल पदं भरण्यासाठी तालुका निवड समितीकडून एकत्रित परीक्षा घेण्याचं ठरलं आहे. त्यानुसार 6 जुलै रोजी 14 केंद्रांवर ही परीक्षा होईल. उमेदवारांनी परीक्षेच्या दिवशी दुपारी 1.30 वाजता केंद्रावर उपस्थित राहायचं आहे.

हेही वाचा : शाळांना यंदा 76 सुट्ट्या; 'इथं' उन्हाळीऐवजी पावसाळी सुट्टी मिळणार?

परीक्षेची प्राथमिक उत्तरतालिका त्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजता https://jalna.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. उमेदवारांना दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत संबंधित तहसील कार्यालयात आक्षेप सादर करता येतील. तर, गुणवत्ता यादी 7 जुलै रोजी निकाल प्रक्रिया पूर्ण होताच जाहीर होईल.

advertisement

परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही

परीक्षा पारदर्शकरीत्या पार पडावी, कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी प्रत्येक केंद्रावर उमेदवाराची तपासणी होईल. शिवाय प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. तसंच मेटल डिटेक्टरद्वारे उमेदवारांची तपासणी केली जाईल. दुपारी 3 वाजल्यानंतर परीक्षा केंद्राचं मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
जालन्यात कोतवाल भरतीसाठी 6 जुलैला फेरपरीक्षा, प्रत्येक केंद्रावर CCTV कॅमेरा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल