नव्या अध्यक्षाच्या नियुक्तीसाठी भाजपने रविवारचं का निवडला? काय आहे दिवसाचे विशेष महत्त्व
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
हिंदू पंचांगानुसार आज, रविवार, 14 डिसेंबर 2025 रोजी अनेक शुभ योग जुळून आले आहेत, ज्यामुळे हा दिवस विशेष फलदायी ठरत आहे. पंचांग हे केवळ तिथी, वार आणि नक्षत्रांची माहिती देत नाही, तर ते विशिष्ट दिवशी असलेल्या शुभ-अशुभ मुहूर्तांचे आणि धार्मिक महोत्सवांचे मार्गदर्शन करते.
advertisement
1/7

हिंदू पंचांगानुसार आज, रविवार, 14 डिसेंबर 2025 रोजी अनेक शुभ योग जुळून आले आहेत, ज्यामुळे हा दिवस विशेष फलदायी ठरत आहे. पंचांग हे केवळ तिथी, वार आणि नक्षत्रांची माहिती देत नाही, तर ते विशिष्ट दिवशी असलेल्या शुभ-अशुभ मुहूर्तांचे आणि धार्मिक महोत्सवांचे मार्गदर्शन करते. आजचा रविवार हा सूर्यदेवाचा दिवस असून, तो तेज, ऊर्जा आणि आरोग्याचा कारक आहे. त्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य त्वरित फळ देते.
advertisement
2/7
वार आणि ग्रह: आज रविवार असल्यामुळे सूर्यदेवाची पूजा, उपासना आणि अर्घ्य देण्याचे विशेष महत्त्व आहे. यामुळे व्यक्तीला आरोग्य, मान-सन्मान आणि यश प्राप्त होते. आज सूर्य उपासना केल्याने करिअरमध्ये प्रगती होते.
advertisement
3/7
तिथी आणि महत्त्व: आज मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्दशी तिथी आहे. ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते. चतुर्दशी तिथी ही भगवान शिव आणि विष्णू यांच्या समन्वयाची प्रतीक आहे. आज केलेल्या कार्याचे फळ त्वरित मिळते.
advertisement
4/7
नक्षत्र योग: आज मृगशिरा नक्षत्र आहे, जे अत्यंत शुभ मानले जाते. मृगशिरा नक्षत्रामध्ये केलेले नवीन कार्य, विशेषत: राजकारणासंबंधित कामांमध्ये यश मिळते. हे नक्षत्र सर्जनशीलता आणि आनंदाचे प्रतीक आहे.
advertisement
5/7
आजचा शुभ मुहूर्त : आजचा अभिजीत मुहूर्त विशेष शुभ आहे. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी किंवा नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे.
advertisement
6/7
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड गेल्या अनेक महिन्यांपासून लांबणीवर पडत असल्याचं चित्र दिसून येत होत. अध्यक्षपदासाठी अनेक नावांची चर्चा होत असताना पक्षसंघटनेतील काही तांत्रिक बाबींमुळे ही निवड लांबणीवर पडत असल्याचं दिसत होत. पण आज अखेर भाजपने त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड केली आहे.
advertisement
7/7
खरमासापूर्वी निवड : दोन दिवसांनी म्हणजेच, 16 डिसेंबरपासून सूर्य धनु राशीत प्रवेश करणार आहे, त्यानंतर कोणतेही शुभ काम करणे निषिद्ध आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षाचीदेखील निवड केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
नव्या अध्यक्षाच्या नियुक्तीसाठी भाजपने रविवारचं का निवडला? काय आहे दिवसाचे विशेष महत्त्व