TRENDING:

Fridge : स्वयंपाकघरात लपलाय धोका? तुमच्या 'या' चुकांमुळे फ्रिजचा होऊ शकतो स्फोट

Last Updated:
आपण या उपकरणावर इतका विश्वास ठेवतो की, फ्रीजचा दरवाजा उघडणे ही एक अगदी सामान्य आणि सुरक्षित क्रिया वाटते. पण, मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यात नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना हा आपला समज बदलून टाकेल.
advertisement
1/9
Fridge : स्वयंपाकघरात लपलाय धोका? तुमच्या 'या' चुकांमुळे फ्रिजचा होऊ शकतो स्फोट
आजच्या काळात फ्रीज हे आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाचे उपकरण आहे. थंड पाणी असो, भाज्या साठवणे असो किंवा रात्रीचे शिल्लक अन्न, फ्रीजशिवाय आपल्या किचनची आपण कल्पनाही करु शकत नाही. जर तो एक दिवस नसेल किंवा बंद झाला तर मात्र गृहिणींसाठी डोकेदुखी होते. जेवण-भाज्या साठवण्याची पंचायत होते. आपण या उपकरणावर इतका विश्वास ठेवतो की, फ्रीजचा दरवाजा उघडणे ही एक अगदी सामान्य आणि सुरक्षित क्रिया वाटते. पण, मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यात नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना हा आपला समज बदलून टाकेल.
advertisement
2/9
घरात फ्रीजचा दरवाजा उघडताच झालेल्या एका भीषण स्फोटात 14 वर्षांच्या एका मुलाचा चेहरा गंभीररीत्या भाजला गेला आणि धक्कादायक म्हणजे डॉक्टरांनी त्याच्या चेहऱ्याच्या 108 हाडांना क्रॅक झाल्याचे सांगितले. राजस्थानच्या सिरोहीमध्येही फ्रीजच्या कंप्रेसरचा स्फोट होऊन एका तरुणाचा मृत्यू झाला होता. हे अपघात केवळ दुर्लक्षामुळे नाहीत, तर फ्रीजच्या आत दडलेल्या एका गंभीर धोक्यामुळे होत आहेत.
advertisement
3/9
फ्रीजमध्ये स्फोट नेमका का होतो?पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर शशिकांत उपाध्याय यांनी या धोकादायक घटनेमागील तांत्रिक कारणे स्पष्ट केली आहेत. त्यांच्या मते, बहुतेक अपघातांमध्ये स्फोटामागे फ्रीजचा मागील भाग म्हणजे कंप्रेसर असतो.
advertisement
4/9
1. ज्वलनशील वायूची गळती : फ्रीजमध्ये थंडपणा टिकवण्यासाठी आइसोब्यूटेन (R-600a) सारख्या ज्वलनशील वायूचा वापर केला जातो. जर ही वायू लीक होऊन बंद खोलीत जमा झाली, तर फ्रीजचा दरवाजा उघडल्याने होणारी एक छोटीशी ठिणगी किंवा विजेच्या संपर्कात येणे एका मोठ्या स्फोटाला आमंत्रण देऊ शकते.
advertisement
5/9
2. अति उष्णता आणि दाब: फ्रीजचा दीर्घकाळ वापर, किंवा फ्रीजरमध्ये गरजेपेक्षा जास्त बर्फ जमा झाल्यास, कंप्रेसरला वायूचा प्रवाह करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. यामुळे फ्रीजचा मागील भाग अति गरम होतो, आतील दाब वाढतो आणि स्फोट होण्याची स्थिती निर्माण होते.
advertisement
6/9
3. जुने आणि कमकुवत उपकरणे: जे फ्रीज 15 वर्षांहून अधिक जुनी आहेत, त्यांची वायरिंग, कंप्रेसर आणि वायू नियंत्रण प्रणाली कमकुवत होतात. यामुळे अपघाताचा धोका अनेक पटीने वाढतो.
advertisement
7/9
जीव वाचवण्यासाठी 'या' गोष्टी लगेच करातुमचा फ्रीज सुरक्षित ठेवण्यासाठी आणि अशा मोठ्या दुर्घटना टाळण्यासाठी काही सोप्या पण अत्यंत आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे:-पुरेसा व्हेंटिलेशन : फ्रीजच्या मागील बाजूस आणि कडेला किमान 6 इंच इतकी हवा खेळती राहण्यासाठी जागा ठेवा. यामुळे निर्माण होणारी उष्णता सहजपणे बाहेर पडेल.-रेफ्रिजरेटरचे तापमान 2°C ते 5°C आणि फ्रीजरचे तापमान -15°C ते -18°C दरम्यानच ठेवा. खूप कमी तापमान सेट केल्यास सिस्टीमवर अतिरिक्त भार येतो.
advertisement
8/9
फ्रीजचे योग्य देखभाल (Maintenance) आणि तपासणीकेवळ खबरदारी पुरेशी नाही, तर फ्रीजची योग्य देखभाल करणेही महत्त्वाचे आहे:धुळीपासून बचाव: फ्रीजच्या कॉइल्स आणि व्हेंटिलेशन फॅनवर धूळ जमा होणार नाही, याची काळजी घ्या.वार्षिक सर्व्हिसिंग): वर्षातून एकदा तरी फ्रीजची तपासणी करून घ्या.
advertisement
9/9
या लक्षणांकडे दुर्लक्ष नको:कंप्रेसर लवकर आणि जास्त गरम होणे.जळाल्याचा वास येणे.फ्रीजमधून खूप मोठा आणि असामान्य आवाज येणे.फ्रीजच्या दरवाजाला करंट लागणे.जर तुम्हाला ही लक्षणे दिसली, तर त्वरित सर्व्हिसिंग करून घ्या. या सोप्या उपायांनी तुम्ही तुमच्या फ्रीजचे आयुष्य वाढवू शकता आणि स्फोटासारख्या जीवघेण्या धोक्यांपासून स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Fridge : स्वयंपाकघरात लपलाय धोका? तुमच्या 'या' चुकांमुळे फ्रिजचा होऊ शकतो स्फोट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल