Hero ने आणली बुलेटला लाजवेल अशी Scooter, लूक पाहून पडाल प्रेमात!
- Published by:sachin Salve
Last Updated:
हिरोने यावर्षी Hero Xoom 160 ही आगळीवेगळी डिझाइन असलेली स्पोर्टी स्कुटरची झलक दाखवली होती. अखेरीस या Hero Xoom 160 ची डिलिव्हरी कंपनीने सुरू केली आहे.
advertisement
1/7

हिरो मोटर्सने मागील काही वर्षांपासून दमदार आणि हटके अशा स्कुटर लाँच करण्याचा धडाका लावला आहे. अशातच हिरोने यावर्षी Hero Xoom 160 ही आगळीवेगळी डिझाइन असलेली स्पोर्टी स्कुटरची झलक दाखवली होती. अखेरीस या Hero Xoom 160 ची डिलिव्हरी कंपनीने सुरू केली आहे.
advertisement
2/7
जानेवारी २०२५ मध्ये झालेल्या इंडिया मोबिलिटी एक्स्पोमध्ये Hero Xoom 160 ची झलक पाहण्यास मिळाली होती. त्यानंतर हिरोनं Hero Xoom 160 लाँच केली. हटके आणि स्पोर्टी लूक असल्यामुळे बुकिंग देखील सुरू झाली होती.
advertisement
3/7
पण, डिलिव्हरी देण्यात कंपनीकडून विलंब झाला. त्यानंतर Hero Xoom 160 ची डिलिव्हरी ऑगस्टपासून सुरू होतील, तर डीलर्स पुन्हा बुकिंग घेण्यास सुरुवात करतील.
advertisement
4/7
डिलिव्हरी एप्रिलमध्ये सुरू होणार होती. पण डीलर्सना स्कूटरचा साठा मिळाला नाही आणि बुकिंग देखील थांबवण्यात आली. पण आता नवीन झूम १६० बद्दल आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण पूर्ण केलं आहे आणि डिलिव्हरी लवकरच सुरू होतील. स्कूटरच्या पहिल्या बॅचच्या डिलिव्हरीनंतर, हिरो झूम १६० ची बुकिंग पुन्हा सुरू होईल.
advertisement
5/7
नवीन Hero Zoom 160 सोबत Hero ने XPulse 210, Xtreme 250R आणि Zoom 125 देखील लाँच केली. या तीन मॉडेल्सची डिलिव्हरी सुरू झाली आहे आणि आता Zoom 160 ची बारी आहे. ही सर्व मॉडेल्स Hero च्या Premia डीलरशिपद्वारे विकल्या जातील, ज्या लवकरच संपूर्ण भारतात अधिक स्टोअरमध्ये दिसतील.
advertisement
6/7
Hero Xoom 160 वेगळं काय? Hero Zoom 160 मध्ये 156cc, लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन आहे जे 14.6bhp आणि 14Nm टॉर्क निर्माण करते आणि CVT गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
advertisement
7/7
Hero Zoom 160 थेट Yamaha Aerox 155 शी स्पर्धा करते, जे लिक्विड-कूल्ड इंजिनने तयार केलं आहे. स्कूटर 14-इंचाचे व्हिल दिले आहे आणि Zoom 160 चे मुख्य आकर्षण म्हणजे हटके डिझाइन आणि इंजिन. या स्कुटरची किंमत १.४८ लाख रुपये जाहीर करण्यात आली आहे.