Railway Recruitment : 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी रेल्वे विभागात नोकरीची संधी; मोबाईलवरुन करा अर्ज, अशी आहे प्रक्रिया
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Railway Recruitment : तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी मोठी संधी आहे.
advertisement
1/5

सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी चांगली संधी चालून आली आहे. उत्तर पूर्व रेल्वेमध्ये भरती प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. 1100 पेक्षा अधिक जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. (फोटो - कॅन्वा)
advertisement
2/5
उत्तर पूर्व रेल्वे विभागात अप्रेंटिस या पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. (फोटो - कॅन्वा)
advertisement
3/5
ner.indianrailways.gov.in या वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता. 24 डिसेंबर ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. (फोटो - कॅन्वा)
advertisement
4/5
ही भरती प्रक्रिया 25 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी ओबीसी आणि EWS च्या उमेदवारांसाठी शंभर रूपये शुल्क आहे. जर तुम्ही या पदासाठी अर्ज करणार असाल तर तुमच्याकडे मान्यता प्राप्त बोर्डाचे दहावी पासचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. (फोटो - कॅन्वा)
advertisement
5/5
फक्त दहावी पासच नाही तर यासोबतच तुमच्याकडे संबंधित आयटीआय ट्रेडचे प्रमाणापत्र असणे अनिवार्य आहे. या दोन गोष्टींशिवाय तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकत नाहीत. अर्जानंतर रेल्वेकडून या भरती प्रक्रियेसंदर्भातील अपडेट वेबसाईटवर टाकले जातील. (फोटो - कॅन्वा)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/करिअर/
Railway Recruitment : 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी रेल्वे विभागात नोकरीची संधी; मोबाईलवरुन करा अर्ज, अशी आहे प्रक्रिया