Kartik Aaryan Dating: सारा-अनन्या-जान्हवीनंतर कार्तिक आर्यन 18 वर्षीय चीअरलीडरच्या प्रेमात, गोव्यातील 'ते' फोटो व्हायरल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Kartik Aaryan Dating: बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर कार्तिक आर्यन सध्या त्याच्या चित्रपटांमुळे नाही, तर एका रुमर्ड अफेअरमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
advertisement
1/8

मुंबई: बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर कार्तिक आर्यन सध्या त्याच्या चित्रपटांमुळे नाही, तर एका रुमर्ड अफेअरमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
advertisement
2/8
सारा अली खान, अनन्या पांडे आणि जान्हवी कपूर यांसारख्या मोठ्या अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेल्यानंतर, आता कार्तिकचं हृदय चक्क युनायटेड किंगडमच्या एका १८ वर्षीय चीयरलीडरसाठी धडकत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
advertisement
3/8
तिचं नाव आहे, करीना कुबिलियूट (Karina Kubiliute). या दोघांच्या अफेअरची चर्चा हवेतच सुरू झालेली नाही. नुकतेच कार्तिक आणि करीना गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसले. गंमत म्हणजे, दोघांनीही एकत्र फोटो शेअर केले नाहीत, पण त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमधील बॅकग्राउंडने सगळं गुपित उघड केलं.
advertisement
4/8
बीचवरचे तेच बेड, तोच टॉवेल आणि तोच समुद्र किनारा... नेटकऱ्यांच्या तीक्ष्ण नजरेतून काहीच सुटलं नाही. या सेम टू सेम फोटोंनी दोघांच्या डेटिंगच्या अफवांना खतपाणी घातलं आहे.
advertisement
5/8
समोर आलेल्या माहितीनुसार, करीना अवघ्या १८ वर्षांची आहे, तर कार्तिक आता ३५ वर्षांचा झाला आहे. त्यांच्यातील १७ वर्षांच्या अंतरामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. ती सध्या यूकेमधील कार्लिसल कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे.
advertisement
6/8
ओळख: करीना एक व्यावसायिक 'चीयरलीडर' आहे. २०२४ मध्ये तिने हायस्कूल पूर्ण केलं असून, २०१९ मध्ये एका स्थानिक स्पर्धेत तिने बक्षीस जिंकल्याचे काही लेखही इंटरनेटवर उपलब्ध आहेत. मूळची ग्रीक वंशाची असलेली करीना सध्या यूकेमध्ये स्थायिक आहे.
advertisement
7/8
असं म्हटलं जातं की, कार्तिक आर्यन करीनाला इंस्टाग्रामवर फॉलो करत होता. मात्र, जशा त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या, तसं कार्तिकने तिला तातडीने अनफॉलो केलं. अद्याप या दोघांनीही आपल्या नात्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केलेलं नाही.
advertisement
8/8
व्यावसायिक पातळीवर कार्तिकसाठी २०२५ चं वर्ष संमिश्र गेलं. ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला त्याचा 'तू मेरी मैं तेरा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. श्रीलीलासोबतही त्याचं नाव जोडलं गेलं होतं, पण करीना कुबिलियूटच्या एन्ट्रीने आता जुन्या सगळ्या चर्चा मागे पडल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Kartik Aaryan Dating: सारा-अनन्या-जान्हवीनंतर कार्तिक आर्यन 18 वर्षीय चीअरलीडरच्या प्रेमात, गोव्यातील 'ते' फोटो व्हायरल