TRENDING:

सकाळी 7 वाजताच दारू प्यायला बसायचा वरूण धवन, नशेतच पूर्ण केलं फिल्मचं शूटिंग, सांगितले शॉकिंग कारनामे

Last Updated:
Varun Dhawan : एका फिल्मच्या शूटिंग वेळी अभिनेता वरूण धवन सकाळी उठताच दारू प्यायला सुरूवात करायचा. याबाबत स्वतः अभिनेत्याने मोठा खुलासा केला आहे.
advertisement
1/8
सकाळी 7 वाजताच दारू प्यायला बसायचा वरूण धवन, नशेतच पूर्ण केलं फिल्मचं शूटिंग
मुंबई: बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आपल्या भूमिकेसाठी कोणतीही हद्द ओलांडतात. पण, अभिनेता वरुण धवनने आपल्या एका चित्रपटातील सीनसाठी केलेला खुलासा ऐकून सगळेच थक्क झाले आहेत.
advertisement
2/8
‘जुग जुग जियो’ चित्रपटातील एका सीनसाठी वरुणला नशेमध्ये भाषण द्यायचं होतं. हा सीन खरा वाटावा म्हणून वरुणने आणि अभिनेता मनीष पॉलने चक्क दोन दिवस सकाळपासूनच दारू पिण्यास सुरुवात केली होती.
advertisement
3/8
नुकत्याच एका मुलाखतीत वरुण धवनने हा किस्सा सांगितला. चित्रपटातील एका क्लायमॅक्स सीनमध्ये त्याला अनिल कपूर यांच्यासमोर नशेमध्ये भाषण द्यायचं होतं.
advertisement
4/8
वरुण म्हणाला, “त्या क्लायमॅक्स सीनच्या वेळी, आम्हाला खरंच नशेमध्ये दिसायचं होतं. म्हणून मी आणि मनीषने सकाळी ७.३० वाजताच दारू पिण्यास सुरुवात केली!”
advertisement
5/8
वरुणने पुढे सांगितलं की, सकाळी लवकर दारू प्यायल्यामुळे दुपारचे २ वाजेपर्यंत त्यांची जीभ आणि आवाज पूर्णपणे अडखळायला लागला होता.
advertisement
6/8
एका दिवसात तो सीन पूर्ण न झाल्यामुळे, वरुणला आणि मनीषला दुसऱ्या दिवशीही सकाळी लवकर हीच प्रक्रिया पुन्हा करावी लागली. “आम्हाला सीनमध्ये नशेमध्ये राहायचं होतं, त्यामुळे शूटिंग संपेपर्यंत दुसऱ्या दिवशीही आम्ही दारू पित होतो,” असं वरुणने सांगितलं.
advertisement
7/8
वरुण धवन सध्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. त्याची ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यात त्याच्यासोबत जान्हवी कपूर, सान्या मल्होत्रा आणि रोहित सराफ आहेत.
advertisement
8/8
याशिवाय, वरुणच्या खात्यात ६ हून अधिक मोठे चित्रपट आहेत. तो लवकरच ‘बॉर्डर-२’, ‘नो एंट्री-२’, ‘है जवानी तो इश्क है’ मध्ये दिसणार आहे. तसेच, त्याच्या गाजलेल्या ‘बदलापूर’चा पुढील भाग आणि ‘देसी बॉईज-२’मध्येही तो आपला जलवा दाखवणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सकाळी 7 वाजताच दारू प्यायला बसायचा वरूण धवन, नशेतच पूर्ण केलं फिल्मचं शूटिंग, सांगितले शॉकिंग कारनामे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल