TRENDING:

Rishab Shetty: वडा पाव खाऊन काढले दिवस, ऑफिस बॉय ते ब्लॉकबस्टर स्टार; ऋषभ शेट्टीची Struggle Story

Last Updated:
Rishab Shetty: आज दक्षिणेतला सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा ऋषभ शेट्टी कधी काळी मुंबईत ऑफिस बॉय म्हणून काम करायचा. त्याची स्ट्रगल स्टोरी वाचून तुम्हीही शॉक व्हाल.
advertisement
1/7
वडा पाव खाऊन काढले दिवस,ऑफिस बॉय ते ब्लॉकबस्टर स्टार;ऋषभ शेट्टीची Struggle Story
आज दक्षिणेतला सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा ऋषभ शेट्टी कधी काळी मुंबईत ऑफिस बॉय म्हणून काम करायचा. त्याची स्ट्रगल स्टोरी वाचून तुम्हीही शॉक व्हाल.
advertisement
2/7
2008 मध्ये ऋषभ शेट्टी आपल्या स्वप्नांच्या मागे धावत कर्नाटकातून मुंबईत आला होता. अंधेरीतल्या एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये तो ऑफिस बॉय होता. हातात फारसे पैसे नसायचे. बाहेरच्या रस्त्यावर वडा पाव खाऊन तो पोट भरायचा आणि मोठं होण्याचं स्वप्न पाहायचा.
advertisement
3/7
2012 मध्ये ‘तुघलक’ या चित्रपटातून ऋषभने अभिनेता म्हणून सुरुवात केली. त्यानंतर ‘उलिदावरू कांदंते’सारख्या काही चित्रपटांमध्ये काम केले. पैसे मिळाले, अनुभव मिळाला, पण नाव मात्र फारसं झळकलं नाही.
advertisement
4/7
2022 मध्ये आलेल्या 'कांतारा'ने त्याचं आयुष्यच बदलून टाकलं. या चित्रपटाने भारतात 200 कोटींपेक्षा जास्त आणि जगभरात तब्बल 450 कोटींची कमाई केली. या यशानंतर तो प्रभास आणि अल्लू अर्जुनसारख्या सुपरस्टार्सच्या रांगेत उभा राहिला.
advertisement
5/7
17 वर्षांनंतर, त्याच मुंबईत आज तो ब्लॉकबस्टर हिरो बनला आहे. कांतारा नंतर तर त्याची लोकप्रियता गगनाला भिडली आहे. अशातच या सिनेमाच पुढचा भाग कांतारा पार्ट 1 आज रिलीज झाला आणि तोही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
advertisement
6/7
ऋषभच्या यशामध्ये त्याच्या पत्नी प्रगती शेट्टीचा देखील मोठा वाटा आहे. प्रगती ‘कांतारा’च्या कॉस्च्युम डिझाइनची जबाबदारी सांभाळत होती. ऋषभ म्हणतो, “लोकांना वाटेल की ती माझी पत्नी आहे म्हणून तिला काम मिळालं. पण खरं म्हणजे तिने खूप मेहनत करून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.”
advertisement
7/7
छोट्या ऑफिस बॉयपासून जागतिक स्तरावर ओळख मिळवणारा कलाकार होण्यासाठी जिद्द, मेहनत आणि चिकाटी किती महत्त्वाची असते.आणि ते ऋषभ शेट्टीने करुन दाखवली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rishab Shetty: वडा पाव खाऊन काढले दिवस, ऑफिस बॉय ते ब्लॉकबस्टर स्टार; ऋषभ शेट्टीची Struggle Story
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल