TRENDING:

500 कोटी कमावणाऱ्या 'कांतारा चॅप्टर 1' मध्ये घडली महाभयंकर चूक! प्रेक्षकांनी शोधून काढलीच, तुम्हीही पाहिली का?

Last Updated:
Kantara Chapter 1 : पौराणिक कथांवर आधारित या चित्रपटाची प्रशंसा होत असतानाच, प्रेक्षकांनी मात्र एक अशी चूक पकडली आहे, जी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे.
advertisement
1/9
500 कोटी कमावणाऱ्या 'कांतारा चॅप्टर 1' मध्ये घडली महाभयंकर चूक! तुम्ही पाहिली का
मुंबई : ऋषभ शेट्टी दिग्दर्शित आणि अभिनित 'कांतारा चॅप्टर १' सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान धुमाकूळ घालत आहे. प्रदर्शित झाल्यावर अवघ्या १० दिवसांतच या चित्रपटाने जगभरात ५०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
advertisement
2/9
पौराणिक कथांवर आधारित या चित्रपटाची प्रशंसा होत असतानाच, प्रेक्षकांनी मात्र एक अशी चूक पकडली आहे, जी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे.
advertisement
3/9
२ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या 'कांतारा चॅप्टर १' ला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. पण, या चित्रपटातील एक सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मेकर्सची एक मोठी चूक प्रेक्षकांच्या बारीक नजरेतून सुटली नाही.
advertisement
4/9
हा व्हायरल होत असलेला सीन 'ब्रह्मकलश' गाण्यातील आहे. या गाण्याच्या ३ मिनिटे ६ सेकंदाला एक प्लास्टिक वॉटर कॅन ठेवलेला स्पष्टपणे दिसत आहे.
advertisement
5/9
प्रेक्षकांचे लक्ष यावर जाण्याचे मुख्य कारण म्हणजे, 'कांतारा' चित्रपटाची कथा कदंब वंशातील आहे, जी अनेक शेकडो वर्षांपूर्वीच्या काळात घडते. त्या प्राचीन काळात प्लास्टिकच्या पाण्याच्या कॅनचा वापर होणे शक्यच नव्हते.
advertisement
6/9
हा स्क्रीनशॉट व्हायरल होताच नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. लोक गंमतीने म्हणत आहेत की, "आम्हाला माहीतच नव्हते की कदंब राजांच्या काळातही बिस्लरीचे कॅन वापरात होते!"
advertisement
7/9
चित्रपटाच्या भव्यतेत, बारीकसारीक तपशिलात जाऊन काम केले असतानाही, मेकर्सकडून इतकी मोठी चूक कशी झाली, याबद्दल प्रेक्षक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
advertisement
8/9
मेकर्सची ही छोटीशी चूक प्रेक्षकांच्या नजरेतून सुटली नाही. या व्हायरल झालेल्या चुकीवर अद्याप चित्रपटाच्या निर्मात्यांनी किंवा ऋषभ शेट्टीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
advertisement
9/9
'कांतारा चॅप्टर १' हा २०२२ मध्ये आलेल्या 'कांतारा' चित्रपटाचा प्रीक्वल आहे. 'कांतारा'लाही लोकांनी प्रचंड पसंत केले होते. या चित्रपटाची कथा ऋषभ शेट्टीनेच लिहिली असून, त्यानेच याचे दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका साकारली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
500 कोटी कमावणाऱ्या 'कांतारा चॅप्टर 1' मध्ये घडली महाभयंकर चूक! प्रेक्षकांनी शोधून काढलीच, तुम्हीही पाहिली का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल