TRENDING:

Prasad Khandekar : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरने घेतलं नवं घर; नेमप्लेटनं वेधलं लक्ष

Last Updated:
प्राजक्ता माळी, राधा सागर, मीरा जोशी, प्राजक्ता गायकवाड अशा अनेक अभिनेत्रींनी त्यांचं स्वतःचं घर घेत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. आता प्राजक्ता पाठोपाठ 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील आणखी एका अभिनेत्याने स्वतःचं घर घेत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
advertisement
1/7
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकरने घेतलं घर, नेमप्लेटनं वेधलं लक्ष
प्राजक्ता माळी, राधा सागर, मीरा जोशी, प्राजक्ता गायकवाड अशा अनेक अभिनेत्रींनी त्यांचं स्वतःचं घर घेत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. आता प्राजक्ता पाठोपाठ 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील आणखी एका अभिनेत्याने स्वतःचं घर घेत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
advertisement
2/7
हा अभिनेता आहे प्रसाद खांडेकर.त्याने त्याच्या नव्या घरात नुकताच गृहप्रवेश केला आहे. या पूजेचे अनेक फोटो त्याने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. सोबतच हास्यजत्रेतील कलाकारांनी त्याच्या घराच्या पूजेला आवर्जून हजेरी लावली आहे.
advertisement
3/7
घराचे खास फोटो पोस्ट करत प्रसाद खांडेकरने लिहिलं आहे की, नवीन घर, अजून एक स्वप्न पूर्ण झालं. घर शोधायला लागलं 1 वर्ष, घर बांधायला गेले 6 महिने, घर सजवायला 2 महिने, फायनली, नवीन घरात शिफ्ट झालो.
advertisement
4/7
पुढे त्याने लिहिलं, जुन्या दोन्हीही घरांनी भरभरून दिलं. त्या दोन्ही वास्तूंचे आभार. मोरया.' या पोस्टवर चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे सोबतच त्याला पुढील आयुष्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत.
advertisement
5/7
प्रसादने नव्या घरासाठी चित्रपटसृष्टीशी संबंधित असलेली नेमप्लेट तयार करून घेतली आहे. या नेमप्लेटवर कलेसंबंधित अनेक चित्रं रेखाटलेली आहेत. व्हिडीओ कॅमेरा, पेन, कलेची दोन रुपं या नेमप्लेटवर पाहायला मिळतात.
advertisement
6/7
प्रसादचं घर खूप सुंदर दिसत आहे. घरात अतिशय सुंदर असं इंटेरिअर करण्यात आलं आहे. या फोटोंमध्ये त्याने घराची झलकही दाखवली आहे.
advertisement
7/7
घरातलं किचनदेखील खूप छान डिझाइन करण्यात आलं आहे. या फोटोंमध्ये त्याची हास्यजत्रेची टीम दिसत आहे. त्यात नम्रता संभेराव आणि गौरव मोरे यांनीही या पूजेला हजेरी लावली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prasad Khandekar : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरने घेतलं नवं घर; नेमप्लेटनं वेधलं लक्ष
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल