Priya Marathe Cancer : पस्तिशी ओलांडली अन् अभिनेत्रींना कॅन्सरने गाठलं, दोघींची अचानक एक्झिट; तिघींनी Cancerला हरवलं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
वयाच्या पस्तिशीनंतर अभिनेत्रींना कॅन्सरने गाठलं. त्यातील काही अभिनेत्रींनी कॅन्सरवर यशस्वी मात केली तर काहींची झुंज अपयशी ठरली.
advertisement
1/8

मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं वयाच्या 38व्या वर्षी कॅन्सरनं निधन झालं. अभिनेत्रीच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे.
advertisement
2/8
प्रिया मराठेची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. प्रियाच्या आधीही अनेक अभिनेत्रीला कॅन्सर झाला होता. वयाच्या पस्तिशीनंतर अभिनेत्रींना कॅन्सरने गाठलं. त्यातील काही अभिनेत्रींनी कॅन्सरवर यशस्वी मात केली तर काहींची झुंज अपयशी ठरली.
advertisement
3/8
अभिनेत्री प्रिया मराठेचं वयाच्या 38व्या वर्षी कॅन्सरनं निधन झालं. तिला कोणता प्रकारचा कॅन्सर झाला होता हे अद्याप कळू शकलेलं नाही.
advertisement
4/8
मराठी अभिनेत्री रसिका जोशी हिचं देखील वयाच्या 38व्या वर्षी कॅन्सरनं निधन झालं. रसिकाला रक्ताचा कॅन्सर झाला होता.
advertisement
5/8
अभिनेत्री सोनाली बेंद्रेला हिला 2018मध्ये कॅन्सर झाला होता. सोनालीला मेटास्टॅटिक कॅन्सर होता. ( मुळ कॅन्सरच्या गाठीपासून कॅन्सरची दुसरी गाठ तयार होते ) तिने परदेशात जाऊन ट्रिटमेन्ट घेतली आणि कॅन्सरवर मात केली.
advertisement
6/8
अभिनेता आयुषमान खुरानाची बायको ताहिरा कश्यपला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. तिने कॅन्सरवर मात केली मात्र काही महिन्यांआधीच तिला पुन्हा त्रास होत असल्याचं तिनं सांगितलं होतं.
advertisement
7/8
हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खान हिनं देखील काही महिन्यांआधीच कॅन्सरवर मात केली आहे. हिनालाही ब्रेस्ट कॅन्सर झाला होता.
advertisement
8/8
दिवंगत मराठी अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती स्मिता तळवळकर यांचं वयाच्या 59व्या वर्षी कॅन्सरनं निधन झालं. त्यांना गर्भाशयाचा कॅन्सर झाला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Priya Marathe Cancer : पस्तिशी ओलांडली अन् अभिनेत्रींना कॅन्सरने गाठलं, दोघींची अचानक एक्झिट; तिघींनी Cancerला हरवलं