TRENDING:

Priya Marathe: कॅन्सरशी झुंज, शुटिंगदरम्यान प्रकृती ढासळली; प्रिया मराठेला मालिकेतून घ्यावा लागलेला हेल्थ ब्रेक!

Last Updated:
Priya Marathe passes Away: गणेशोत्सवाचा उत्साह असताना, मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन झालं. वयाच्या 38 व्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला.
advertisement
1/7
शुटिंगदरम्यान प्रकृती ढासळली अन्  प्रियाला मालिकेतून घ्यावा लागलेला हेल्थ ब्रेक
गणेशोत्सवाचा उत्साह असताना, मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन झालं. वयाच्या 38 व्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला.
advertisement
2/7
प्रिया मराठे गेल्या दीड-दोन वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होती. मात्र अखेर तिची ही झुंज अपयशी ठरली आणि तिनं या जगाचा निरोप घेतला. तिच्या जाण्याने मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. हेल्थच्या कारणामुळे तिला मालिकेतूनही ब्रेक घ्यावा लागला होता.
advertisement
3/7
मागील दोन-अडीच वर्षांपासून प्रियावर उपचार सुरू होते. ती हेल्थचा त्रास असतानाही काम करत होती. आजाराशी झुंज देत तिचं काम सुरु होतं मात्र तब्बेत अधिक खालावल्यामुळे तिला 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेतून हेल्थ ब्रेक घ्यावा लागला.
advertisement
4/7
गेल्या काही महिन्यांपासून ती पडद्यापासून आणि सार्वजनिक जीवनापासून दूर होती. त्यामुळे चाहत्यांनाही तिच्या तब्येतीबद्दल अनेक प्रश्न पडले होते. सोशल मीडियावरही ती सक्रिय नव्हती. तिची लास्ट पोस्ट 11 ऑगस्ट 2024 ची आहे. प्रियाच्या अकाली निधनामुळे कुटुंबासह, मित्र-परिवार आणि चाहते सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सर्वजण तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
advertisement
5/7
2006 मध्ये ‘या सुखांनो या’ या मालिकेतून प्रिया छोट्या पडद्यावर झळकली. त्यानंतर ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथं मी’, ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’, ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ अशा मालिकांमधून तिने घराघरात आपली छाप पाडली. ‘तुझेच मी गीत गात आहे’मधील मोनिका या नकारात्मक भूमिकेतूनही प्रेक्षकांनी तिला भरभरून दाद दिली.
advertisement
6/7
हिंदी मालिकांमध्येही तिची दमदार उपस्थिती होती. ‘पवित्र रिश्ता’, ‘उतरन’, ‘कसम से’, ‘बडे अच्छे लगते है’ या शोमधून ती प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. कॉमेडी सर्कससारख्या रिअॅलिटी शोमधून तिची विनोदी बाजूही प्रेक्षकांसमोर आली.
advertisement
7/7
प्रिया, ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांची सून आणि अभिनेता शंतनू मोघेची पत्नी होती. 2012 मध्ये शंतनूसोबत तिचं लग्न झालं. प्रियाच्या निधनाने मोघे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Priya Marathe: कॅन्सरशी झुंज, शुटिंगदरम्यान प्रकृती ढासळली; प्रिया मराठेला मालिकेतून घ्यावा लागलेला हेल्थ ब्रेक!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल