TRENDING:

Diwali Padwa 2025 Wishes : पती-पत्नीच्या गोड नात्याचा सण करा साजरा, शेअर करा हे खास शुभेच्छा संदेश

Last Updated:
Diwali Padwa 2025 Wishes In Marathi : दिवाळीचा सण उत्साहात आणि आनंदात साजरा केल्यानंतर आज पतीपत्नीच्या नात्यातील प्रेमाचा सण आहे. दिवाळी पाडवा हा सण पती-पत्नीच्या नात्यासाठी अतिशय खास असतो. या दिवळी पत्नी पतीला ओवाळते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तर पती आपल्या पत्नीला प्रेमाने भेटवस्तू देतो. याशिवाय साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याच्या दिवशी कोणतेही काम सुरू करण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नसते. या खास दिवशी येथे दिलेले शुभेच्छा संदेश तुमच्या सोशल मीडियावर शेअर करून मित्रांना आणि नातेवाईकांना शुभेच्छा द्या.
advertisement
1/7
पती-पत्नीच्या गोड नात्याचा सण करा साजरा, शेअर करा हे खास शुभेच्छा संदेश
जुना झाला कालचा काळोख, तेजोमय झाला आजचा प्रकाश, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या नात्यासाठी हा पाडवा खास, दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
2/7
साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे, उत्तम दिनाचे महात्म्य आहे, सुखद ठरो हा छान पाडवा, त्यात असूदे अवीट गोडवा! दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
3/7
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा, दिवाळीचा पाडवा आणतो नात्यात गोडवा, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना मनःपूर्वक शुभेच्छा!
advertisement
4/7
सर्वत्र प्रेमाचा सुगंध पसरला, आनंदाचा दिवस आला, देवाकडे माझी एकच प्रार्थना, सुख-समृद्धी लाभू दे तुम्हाला, दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
5/7
पणतीतल्या दिव्याच्या तेजाने लख्ख पाडवा, पती-पत्नीच्या नात्यातील वाढवण्यास गोडवा, उटण्याचा मंत्रमुग्ध सुगंध घेऊन आला पाडवा.... दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
6/7
सारे रोजचे तरीही भासे नवा प्रेमळ सहवास, सोन्यासारख्या नात्याचा पाडव्याचा दिवस खास, दिवाळी पाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
advertisement
7/7
असेच दिवे जळत राहो, मनाशी मने जुळत राहो, सुख समृद्धि दारी येवो, लक्ष्मी घरी नांदत राहो, दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Diwali Padwa 2025 Wishes : पती-पत्नीच्या गोड नात्याचा सण करा साजरा, शेअर करा हे खास शुभेच्छा संदेश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल