TRENDING:

photos : उन्हाळ्यात दररोज किती पाणी प्यावं? तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती

Last Updated:
सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. तसेच प्रचंड उकाडा जाणवत आहे. अशावेळी अनेकांना मोठ्या प्रमाणात घामही येते. अशावेळी डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. म्हणून उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे असा सल्ला डॉक्टर देतात. त्यामुळे मग उन्हाळ्यात प्रत्येक दिवसाला नेमके किती पाणी प्यावे, हे जाणून घेऊयात. (आकांक्षा दीक्षित, प्रतिनिधी)
advertisement
1/5
photos : उन्हाळ्यात दररोज किती पाणी प्यावं? तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती
उन्हाळ्यात किती पाणी प्यावे, हे प्रत्येका माहिती असायला हवे. त्यामुळे आरोग्याला मोठा फायदा होतो. याबाबत दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयातील डॉ. टीना कौशिक यांनी महत्त्वाची माहिती दिली.
advertisement
2/5
उन्हाळ्यात योग्य प्रमाणात पाणी प्यायला हवे. यामुळे तुमचे शरीर आरोग्यदायी राहते. तसेच आपल्या वजनानुसार पाणी प्यायला हवे. साधारणपणे दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्रत्येकाने दररोज प्यायला हवे, असेही त्या म्हणाल्या.
advertisement
3/5
डॉ. टीना कौशिक या पुढे म्हणाल्या की, पाणी पिणे हे मूतखड्याच्या समस्येवर फायदेशीर आहे. जर एखाद्या व्यक्तीला मूतखड्याचा त्रास असेल तर त्याने भरपूर पाणी प्यावे. त्याच्यासाठी भरपूर पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते.
advertisement
4/5
टीना कौशिक या सफदरजंग रुग्णालयात मागील 6 महिन्यांपासून ज्यूनिअर रेसिडेंसच्या पोस्टवर काम करत आहेत. उन्हाळ्यात साधे पाणी प्यावे. फ्रीजमधील पाणी पिणे टाळावे. यामुळे भूक प्रभावित होते. तसेच शरीरात एंडोटॉक्सिन रिलीज होणे सुरू होते. म्हणून साध्या पाण्याला प्राथमिकता द्यावी, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
advertisement
5/5
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्यविषयक सल्ले तज्ञांशी झालेल्या संवादावर आधारित आहेत. ही सामान्य सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच वापरावी. कोणत्याही हानीसाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
photos : उन्हाळ्यात दररोज किती पाणी प्यावं? तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल