TRENDING:

International Tea Day : चहाबद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहीतच नसतील, वाचा रंजक तथ्य..

Last Updated:
Interesting Facts About Tea : संयुक्त राष्ट्रसंघातर्फे आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणजेच International Tea Day हा 21 मे ला साजरा केला जातो. चहा हे ऊर्जा देणारं पेय समजलं जातं, पण आपल्या देशात तर चहाला अमृततुल्य दर्जा आहे. पण याव्यतिरिक्त तुम्हाला चहाबद्दल काही रंजक गोष्टी आज आम्ही सांगणार आहोत.
advertisement
1/5
चहाबद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहीतच नसतील, वाचा रंजक तथ्य..
चहा पिणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. भारतात तर या लोकांना चहाप्रेमी म्हंटल जातं. खरं तर चहा हे पाण्यानंतर सर्वाधिक प्यायलं जाणारं पेय आहे.
advertisement
2/5
चहाचा शोध अपघातानं लागल्याची माहिती आहे. इसवी सन पूर्व 2737 मध्ये चिनी सम्राट सेन नूंग यांनी चहाचा शोध लावला. चहाची पानं अपघातानं गरम पाण्यात पडली आणि त्यानंतर हे पेय चहा म्हणून ओळखले जाऊ लागले.
advertisement
3/5
भारतात चहाची लोकप्रियता भन्नाट आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी चहा मिळतो आणि तोही अगदी कमी किमतीमध्ये. परंतु पूर्वीच्या काली चहा हे खूप महागडं पेय असायचं. महिला चहापत्ती कपाटात कुलूपबंद करून ठेवत.
advertisement
4/5
भारतात लोकांना कोणत्याही वेळी आणि कोणत्याही प्रसंगी चहा हवा असतो. पाहुणे आले की त्यांचे स्वागत चहाने करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. परंतु इंग्लडमध्ये पूर्वी चहापानाचा कार्यक्रम नेहमी 3 ते 6 मध्ये असायचा. रोज याचवेळी चहा प्यायला जायचा.
advertisement
5/5
पूर्वी चहाचं सर्वाधिक उत्पन्न चीनमध्ये घेतलं जायचं आणि यापैकी सर्वाधिक चहा ब्रिटनमध्ये निर्यात केला जायचा. युएईमध्ये चहा पिणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
International Tea Day : चहाबद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहीतच नसतील, वाचा रंजक तथ्य..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल