TRENDING:

Marathwada Weather Update : मराठवाड्यातील हवामानात बदल, थंडी झाली कमी, आज काय स्थिती?

Last Updated:
Marathwada Weather Update: मराठवाड्यातील थंडीची लाट ओसरली आहे. आज हवामानाची स्थिती जाणून घ्या.
advertisement
1/5
मराठवाड्यातील हवामानात बदल, थंडी झाली कमी, आज काय स्थिती?
डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मराठवाड्यात थंडीची लाट आली होती. पण काही दिवसांपासून थंडीचा जोर काहीसा ओसरला असून किमान तापमानात वाढ झाली आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये सध्याला तापमानामध्ये वाढ झालेली आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ वातावरण असणार आहे.
advertisement
2/5
परभणी आणि धाराशिवमध्ये किमान तापमान 18 अंश सेल्सिअस एवढे असेल. या ठिकाणी ढगाळ वातावरण असेल. बीडमध्ये किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहील. या ठिकाणी हवामान आज कोरडे असेल.
advertisement
3/5
हिंगोली आणि नांदेडमध्ये किमान तापमान 15 अंश सेल्सिअस असेल. लातूर या जिल्ह्यामध्ये किमान तापमान हे 17 अंश सेल्सिअस राहील. या जिल्ह्यांमध्ये काही भागात ढगाळ वातावरण हे असणार आहे.
advertisement
4/5
छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस असेल आणि किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहील. संभाजीनगर शहरामध्ये सकाळच्या वेळी धुके असणार आहेत. ढगाळ वातावरण असेल.
advertisement
5/5
शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी. वातावरणात सातत्याने बदल होत असल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या या उद्भवत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्य जपावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Weather Update : मराठवाड्यातील हवामानात बदल, थंडी झाली कमी, आज काय स्थिती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल