CM Jagan Mohan : मोठी बातमी! आंध्रचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींच्या ताफ्यावर दगडफेक, कपाळाला खोच, PHOTOS
- Published by:Rahul Punde
Last Updated:
CM Jagan Mohan : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याचा प्रकार घडला.
advertisement
1/5

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीत ते जखमी झाले. आज निवडणूक प्रचारादरम्यान मेमंथा सिद्धम बस यात्रेवर दगडफेक करण्यात आली. सीएम वायएस जगन यांच्या कपाळाला किरकोळ दुखापत झाली आहे. तर शेजारी उभे असलेले आमदार वेलमपल्ली यांच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली.
advertisement
2/5
जगन मोहन रेड्डी यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी त्यांच्या 'मेमंथा सिद्धम' बस यात्रेसोबत विजयवाड्यातून जात असताना ही घटना घडली. त्यांच्या बसवर अज्ञात व्यक्तीने गोफणीतून दगडफेक करून त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.
advertisement
3/5
मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यावर सिंहनगर येथील विवेकानंद स्कूल सेंटरजवळ दगडफेक झाली. यात त्यांच्या डाव्या भुवईच्या अगदी वरती जखम झाली, दगड लागल्याने तिथे खोच पडली. सीएम जगन यांच्या शेजारी उभे असलेले आमदार वेल्लमपल्ली यांच्याही डाव्या डोळ्याला दुखापत झाली आहे.
advertisement
4/5
घटनेच्या वेळी वायएस जगन लोकांना पाहून हात दाखवत होते. दगड लागल्यानंतर त्यांना तात्काळ बसमध्ये नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार केले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून ते व्यवस्थित असल्याचे सांगितले आहे. यानंतर वायएस जगन यांनी आपला बस प्रवास सुरू ठेवला.
advertisement
5/5
दरम्यान, विजयवाडा YSRCP नेत्यांनी TDP कार्यकर्त्यांवर भ्याड हल्ल्यामागे असल्याचा आरोप केला. आठवडाभरापूर्वी आंध्र प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांनी मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांना नोटीस बजावली होती. सीएम जगन यांनी रॅलीतील भाषणादरम्यान तेलुगू देसम पार्टीचे (टीडीपी) अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांच्याबद्दल टिप्पणी केली होती, त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
CM Jagan Mohan : मोठी बातमी! आंध्रचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींच्या ताफ्यावर दगडफेक, कपाळाला खोच, PHOTOS