PM Modi Birthday : पंतप्रधान झाल्यानंतर मोदींना वाढदिनी आईने दिले होते पैसे, 2014 पासून कसं केलं बर्थडे सेलिब्रेशन
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ७२ वा वाढदिवस साजरा करत असून गेल्या दहा वर्षात मोदींनी साधेपणाने वाढदिवस साजरा केला. कोरोना काळातही त्यांनी जनतेसाठी संदेश दिला होता.
advertisement
1/11

पंतप्रधान नरेंद्र मोजी आज १७ सप्टेंबर रोजी त्यांचा ७३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. भाजपकडून पंतप्रधान मोदींचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्याची तयारी करण्यात आलीय. तर पंतप्रधान मोदी मात्र आतापर्यंत साधेपणाने वाढदिवस साजरा करत आले आहेत. आज ते काही विकास कामांचे उद्घाटन करणार असून योजनेचा शुभारंभही करणार आहेत.
advertisement
2/11
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसापासून ते महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत देशभरात सेवा पंधरवडा भाजपकडून साजरा केला जातो. दिल्लीत भाजप नेत्यांनीही मोदींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तयारी केलीय. गेल्या दहा वर्षात मोदींनी साधेपणाने वाढदिवस साजरा केला. कोरोना काळातही त्यांनी जनतेसाठी संदेश दिला होता.
advertisement
3/11
२०२२ - पंतप्रधान मोदींनी त्यांच्या वाढदिनी मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामबियातून आणलेले चित्ते सोडले होते.
advertisement
4/11
२०२१ - पंतप्रधान मोदींनी ७१ व्या वाढदिवसाला जनतेला कोरोनापासून वाचण्यासाठी संदेश दिला होता. लसीकरण मोहिमेसाठीही त्यांनी प्रोत्साहन दिलं होतं.
advertisement
5/11
२०२० - देशात कोरोनाची लाट होती. यावेळी भाजपने सेवा पंधरवडा साजरा केला. पंतप्रधान मोदींनी जनतेच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन अनेक योजना सुरू केल्या.
advertisement
6/11
२०१९ - पंतप्रधान मोदी यांनी त्यांचा वाढदिवस आई हिराबेन यांच्यासोबत साजरा केला होता. आईचा आशीर्वाद घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
advertisement
7/11
२०१८ - पंतप्रधान मोदींनी त्यांचा वाढदिवस वाराणसी या त्यांच्या लोकसभा मतदारसंघात साजरा केला होता. त्यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना अनेक भेटवस्तू दिल्या होत्या.
advertisement
8/11
२०१७ - पंतप्रधान मोदींना गुजरातमध्ये विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा केला होता. बराच वेळ त्यांनी आई हिराबेन यांच्यासोबत घालवला.
advertisement
9/11
२०१६ - पंतप्रधान मोदींनी ६६ वा वाढदिवस दिव्यांग व्यक्तींसोबत साजरा केला. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी शालेय साहित्य वाटप केलं होतं.
advertisement
10/11
२०१५ - पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ६५ वा वाढदिनी सेना स्मारकाला भेट दिली होती. १९६५ च्या इंडो पाक युद्धातील सैनिकांच्या शौर्याची आठवण जागवली होती.
advertisement
11/11
२०१४ - पंतप्रधान झाल्यानंतरच्या या वाढदिनी मोदींना आई हिराबेन यांनी ५००१ रुपये भेट म्हणून दिले होते. पंतप्रधान मोदींनी हे पैसे जम्मू काश्मीर पूर बाधितांसाठीच्या निधीत दान केले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
PM Modi Birthday : पंतप्रधान झाल्यानंतर मोदींना वाढदिनी आईने दिले होते पैसे, 2014 पासून कसं केलं बर्थडे सेलिब्रेशन