TRENDING:

Neeraj Chopra ने पहिल्यांदाच शेअर केला पत्नीसोबत फोटो, 6 महिन्यापूर्वी केलं होतं लग्न! म्हणतो...

Last Updated:
Neeraj Chopra share wife Photos : नीरज चोप्रा याने लग्नानंतर पहिल्यांदाच त्याची पत्नी हिमानी मोरसोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
advertisement
1/5
Neeraj Chopra ने पहिल्यांदाच शेअर केला पत्नीसोबत फोटो
भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याने 16 जानेवारी 2025 रोजी हरियाणातील सोनीपत येथील टेनिसपटू हिमाणी मोरसोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर तीन दिवसांनी त्याने सोशल मीडियावर याची माहिती दिली.
advertisement
2/5
अशातच नीरज चोप्रा याने लग्नानंतर पहिल्यांदाच त्याची पत्नी हिमानी मोरसोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तो तिसऱ्या ग्रँड स्लॅम विम्बल्डनचा अंतिम सामना पाहण्यासाठी आला होता. हा सामना सुमारे 5 दिवसांपूर्वी झाला होता.
advertisement
3/5
नीरज चोप्रा याने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो विम्बल्डनच्या ग्राऊंडबाहेर दिसतोय. तिथं तो आपल्या पत्नीसोबत सामना पाहण्यासाठी आला होता. जगातील दोन सर्वोत्तम पुरुष टेनिस खेळाडूंना एकमेकांशी झुंजताना पाहायला मिळालं, अशी भावना त्याने व्यक्त केली.
advertisement
4/5
नीरजची पत्नी हिमाणी मोर ही मूळची हरियाणामधील लरसाउली येथील असून, ती एक माजी टेनिसपटू आहे. तिने सोनीपत येथील लिटल एंजल्स स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि दिल्लीतील मिरांडा हाऊस येथून पदवी प्राप्त केली.
advertisement
5/5
सध्या ती अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स येथील मॅककॉर्मॅक इसेनबर्ग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून स्पोर्ट्स मॅनेजमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स ऑफ सायन्स करत आहे. हिमाणीने फ्रँकलिन पियर्स युनिव्हर्सिटीमध्ये अर्धवेळ सहाय्यक प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे आणि एमहर्स्ट कॉलेजमध्ये महिला टेनिस संघाचे व्यवस्थापन करते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Neeraj Chopra ने पहिल्यांदाच शेअर केला पत्नीसोबत फोटो, 6 महिन्यापूर्वी केलं होतं लग्न! म्हणतो...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल