Ranji Trophy : रणजी ट्रॉफीच्या फायनलमधून मुंबई OUT, विदर्भाने मारली बाजी, 80 धावांनी उडवला धुव्वा
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
रणजी ट्ऱाफीच्या सेमी फायनलमध्ये मुंबईचा पराभव झाला आहे. विदर्भ संघाने मुंबईचा 80 धावांनी पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे.
advertisement
1/6

रणजी ट्ऱाफीच्या सेमी फायनलमध्ये मुंबईचा पराभव झाला आहे. विदर्भ संघाने मुंबईचा 80 धावांनी पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे.
advertisement
2/6
खरं तर विदर्भाने दुसऱ्या डावात मुंबईसमोर 406 धावांचे लक्ष्य ठेवले होते.या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 325 धावातच आटोपला होता. त्यामुळे विदर्भाने 80 धावांनी सामना जिंकला.
advertisement
3/6
मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे, सुर्यकुमार यादव आणि शिवम दुबे हे सगळेच मोठी धावसंख्या करण्यात फेल ठरले होते. त्यातल्या त्यात शार्दुल ठाकूरने तगडी लढत देण्याचा प्रयत्न केला. पण त्याला दुसऱ्या खेळाडूची साथ मिळाली नाही.
advertisement
4/6
त्यामुळे मुंबईचा डाव 325 धावातच आटोपला. एकवेळ मैदानात शार्दुल आणि शम्स मुलानी असताना मुंबई जिंकेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण विदर्भाच्या गोलंदाजांनी डाव फिरवत बाजी मारली
advertisement
5/6
या सामन्यात विदर्भाने पहिल्या डावात 383 धावा केल्या होत्या. तर मुंबई पहिल्या डावात 270 धावाच करू शकली होती. त्यामुळे दुसऱ्या डावात विदर्भाने 292 धावा करत त्यांना 113 धावांची लिड होती, असे मिळून त्यांनी मुंबईसमोर 405 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
advertisement
6/6
दरम्यान तिकडे नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात आणि केरळ यांच्यात रणजी ट्रॉफीचा सेमी फायनल सामना खेळवण्यात आला. सामन्याच्या पाचव्या दिवशी, केरळने प्रथम गुजरातला 455 धावांवर गुंडाळले आणि नंतर सामन्यात 2 धावांची आघाडी घेत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Ranji Trophy : रणजी ट्रॉफीच्या फायनलमधून मुंबई OUT, विदर्भाने मारली बाजी, 80 धावांनी उडवला धुव्वा