Snake Vs Mongoose : साप मुंगसाला का घाबरतो? यामागचं सायन्स क्वचित कोणाला असेल ठावूक
- Published by:Devika Shinde
Last Updated:
मुंगसाचा सापाशी भांडण हा निसर्गातील एक चर्चीत भांडण मानलं जातं, ज्यात बहुतांश वेळा सापाला हार मानून पळून जावं लागतं. पण असं का?
advertisement
1/8

साप म्हटलं की सगळ्यांनाच धडकी भरते. कारण सापाच्या एका दंशाने कोणाचाही मृत्यू होऊ शकतो. जंगलातील काही बलाढ्य आणि मोठे प्राणी ही सापापासून लांब जातात. पण असा एक प्राणी आहे ज्याला साप स्वत: घाबरतो आणि त्याच्यापासून लांब पळतो.
advertisement
2/8
हा प्राणी आहे मुंगस. मुंगसाचा सापाशी भांडण हा निसर्गातील एक चर्चीत भांडण मानलं जातं, ज्यात बहुतांश वेळा सापाला हार मानून पळून जावं लागतं. पण असं का? साप तर विषारी प्राणी आहे, त्याने एक दंश केला तर मुंगसाचे प्राण ज्यायला पाहिजे, पण तरीही साप त्याला का घाबरतो?
advertisement
3/8
खरंतर यामागे काही शास्त्रीय कारणं आहेत? चला तर मग, जाणून घेऊया.
advertisement
4/8
1. मुंगसाची झपटण्याची पद्धत आणि फुर्ती मुंगूस अतिशय चपळ प्राणी आहे. साप जेव्हा हल्ला करतो, तेव्हा त्याचा विषारी दंश टाळणं ही फार कठीण गोष्ट असते. पण मुंगूस त्याच्या जोरदार आणि अतिशय वेगाच्या हालचालीमुळे सापाच्या दंशापासून स्वत:ला वाचवतो.
advertisement
5/8
2. शरीरात विषाला सहन करणारी प्रतिकारशक्ती यामागचं सायंटिफिक कारण अधिक रंजक आहे. मुंगसाच्या शरीरात Acetylcholine receptors नावाचे विशेष रिसेप्टर्स असतात, जे सापाच्या विषात असलेल्या neurotoxins ना पूर्णपणे बांधून घेत नाहीत. याचा अर्थ असा की, सापाने चावलं तरीही त्याचं विष मुंगसाच्या शरीरात फारसं काम करत नाही. त्यामुळे मुंगूस सापाच्या दंशापासून काहीसा सुरक्षित राहतो.
advertisement
6/8
3. शिकारीची रणनीती मुंगूस सापाच्या डोक्यावर एकदम अचूक हल्ला करतो. त्याची नजर आणि मेंदू समन्वय कमाल असतो. त्यामुळे तो सापाच्या फुत्काराला न घाबरता वेळ साधून एकाच चाव्याने त्याचा शेवट करतो.
advertisement
7/8
4. सापामध्ये नैसर्गिक भीती साप हा एक शिकारी प्राणी आहे, पण तो स्वतःसुद्धा इतर प्राण्यांचा भक्ष्य बनतो. मुंगूस त्याचा नैसर्गिक शत्रू असल्यामुळे सापाच्या डीएनएमध्येच त्याची भीती ‘प्रोग्राम’ झालेली असते. त्यामुळे कधी कधी लढायच्या आधीच साप मागे सरकतो किंवा पळ काढतो.
advertisement
8/8
मुंगसाला भारतात काही ठिकाणी शुभ मानलं जातं. खासकरून ग्रामीण भागात, घराजवळ मुंगूस दिसला की लोक समाधानी होतात. कारण, तो साप, उंदीर, किडे इत्यादींपासून घराचं रक्षण करतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Snake Vs Mongoose : साप मुंगसाला का घाबरतो? यामागचं सायन्स क्वचित कोणाला असेल ठावूक