TRENDING:

कोळ्याचा प्रायव्हेट पार्ट पाहून शास्त्रज्ञ आश्चर्यचकीत, वैज्ञानिक जगात खळबळ

Last Updated:
Spider Private Part : शास्त्रज्ञांनी टॅरंटुला स्पायडरच्या 4 नवीन प्रजातींचा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आहे आणि त्याचा प्रायव्हेट पार्ट पाहून त्यांना धक्काच बसला.
advertisement
1/7
कोळ्याचा प्रायव्हेट पार्ट पाहून शास्त्रज्ञ आश्चर्यचकीत, वैज्ञानिक जगात खळबळ
प्रत्येक सजीवाची प्रजनन प्रक्रिया वेगवेगळी असते आणि त्यांचे प्रायव्हेट पार्टही. अशाच एका कोळ्याचा प्रायव्हेट पार्ट शास्त्रज्ञांनी पाहिला आणि त्यांना आश्चर्यचा धक्काच बसला. कोळ्याच्या प्रायव्हेट पार्टने वैज्ञानिक जगात खळबळ उडवून दिली असं म्हणायलाही हरकत नाही. आता नेमकं असं शास्त्रज्ञांनी काय पाहिलं हे पाहण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.
advertisement
2/7
टॅरंटुला स्पायडरच्या 4 नवीन प्रजातींचा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आहे. सर्वात मोठी प्रजाती सॅटीरेक्स फेरॉक्स आहे. 'फेरॉक्स' म्हणजे क्रूर. त्याची ओळख आक्रमक स्वभावाची आहे. दुसरी प्रजाती एस. अरेबिकस आहे, जी अरबी द्वीपकल्पात आढळते. तिसरी प्रजाती एस. सोमालिकस आहे, जी सोमालियात आढळते. चौथी प्रजाती एस. स्पेसिओसस आहे, ज्याचे सौंदर्य आणि चमकदार रंग त्याला खास बनवतात.
advertisement
3/7
ज्यांच्यात शास्त्रज्ञांना असं आढळून आलं आहे की या कोळ्यांना पारंपारिक लिंग नसतं, तर ते पोटाशी जोडलेल्या नलिकातून शुक्राणू गोळा करतात. यानंतर ते पॅल्प्स नावाच्या अवयवांद्वारे मादी कोळ्यांमध्ये घातले जातं. पॅल्प्स म्हणजे टॅरंटुला स्पायडरमधील हातासारखे अवयव आहेत जे इतके मोठे आहेत की शास्त्रज्ञांनी यापूर्वी कधीही पाहिले नव्हते.
advertisement
4/7
शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की सर्वात मोठ्या नराच्या पॅल्प्सची लांबी 5 सेमी असते, जी त्यांच्या पायांच्या बरोबरीची असते आणि शरीराच्या वरच्या भागाच्या 3.85 पट मोठी आहे.
advertisement
5/7
शास्त्रज्ञांनी या प्रजातीला एका नवीन वंशात स्थान दिलं आहे, ज्याला सॅटीरेक्स असं नाव देण्यात आले आहे. रेक्स म्हणजे राजा. ग्रीक पौराणिक कथांमधील नर आत्म्यांना सॅटीरेक्स म्हणतात, जे त्यांच्या विशेष शरीररचनेसाठी प्रसिद्ध आहेत. सर्वात मोठी प्रजाती सॅटीरेक्स फेरॉक्स आहे, ज्याचा अर्थ क्रूर आहे.
advertisement
6/7
शास्त्रज्ञांमध्ये प्रश्न असा आहे की इतक्या मोठ्या पॅल्प्सचा उपयोग काय? संशोधनात असं म्हटलं आहे की ते नर कोळ्यांसाठी संरक्षक कवचसारखे आहे. यामुळे मादी कोळींपासून होणारे हल्ले टाळण्यास मदत होते, कारण कोळींमध्ये मिलन हा धोका असतो. कधीकधी, मादी कोळी नर कोळी मारतात आणि खातात.
advertisement
7/7
हा शोध जर्नलचा भाग आहे. जो झूकीजमध्ये प्रकाशित झाला आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की हे उत्क्रांतीचं एक उत्तम उदाहरण आहे. जिथं जीवाने पुनरुत्पादनासह त्याच्या सुरक्षिततेसाठी एक उपाय शोधला आहे. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
कोळ्याचा प्रायव्हेट पार्ट पाहून शास्त्रज्ञ आश्चर्यचकीत, वैज्ञानिक जगात खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल