TRENDING:

Pune : परिक्षेला निघालेल्या विद्यार्थीनीला मारूती अल्टोची धडक, तरूणी 6 ते 7 फुट उंचावर उडाली, अपघाताचा VIDEO

Last Updated:

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत परिक्षेला निघालेल्या विद्यार्थीनीला एका भरधाव मारूती अल्टो कारने धडक दिल्याची घटना घडली आहे.पुण्याच्या मंचरमध्ये ही घटना घडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Pune Accident News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत परिक्षेला निघालेल्या विद्यार्थीनीला एका भरधाव मारूती अल्टो कारने धडक दिल्याची घटना घडली आहे.पुण्याच्या मंचरमध्ये ही घटना घडली आहे. या भीषण अपघातात विद्यार्थिनीचा पाय फ्रॅक्चर झाला असून तिला गंभीर इजा झाल्या आहेत.23 सप्टेंबरला घडलेल्या या घटनेचा आता सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. या सीसीटीव्हीत कार चालकाची चूक असल्याचे स्पष्ट दिसत आहे.मात्र आमच्याकडे कोणतीही तक्रार प्राप्त न झाल्याने मंचर पोलिसांनी सांगितलं आहे.
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी निघालेल्या एका विद्यार्थीनीला एका मारूती अल्टो कारने धडक दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत ऋतुजा पारधी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर मंचर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सूरू आहेत. दरम्यान या अपघातात ऋतुजा पारधीचा पाय फ्रॅक्चर झाला असून तिला गंभीर इजा झाल्या आहेत. या सगळ्या घटनेनंतर आता या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. हा सीसीटीव्ही फुटेज पाहून अंगावर काटा येतो.

advertisement

रसायनशास्त्राच्या प्रात्यक्षिक परिक्षेसाठी महाविद्यालयाच्या दिशेने निघालेल्या ऋतुजा पारधीला समोरून येणाऱ्या भरधाव कारने भीषण धडक दिली होती. ही धडक इतकी जोरात होती की ऋतुजा अक्षरश 7 ते 8 फुट हवेत उडाली होती. त्यानंतर पुन्हा जमिनीवर आदळली होती.त्यामुळे सीसीटीव्ही पाहिला असता कार चालकाची यामध्ये स्पष्ट चूक दिसते आहे. मात्र आमच्याकडे कोणतीही तक्रार आली नसल्याचं मंचर पोलीसांनी म्हटलं आहे.

advertisement

पुणे सोलापूर महामार्गावर अपघात 

पुणे-सोलापूर महामार्गावर मदनवाडी (सकुंडे वस्ती) गावच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात तीन गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्या एका रिल स्टारने आपल्या फॉर्च्युनरने क्रेटा आणि व्हॅगनर गाडीला धडक दिल्याने हा अपघात घडला. याप्रकरणी, फॉर्च्युनर चालकाविरुद्ध भिगवण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

प्रतीक राम शिंदे (वय 24, रा. भादलवाडी, ता. इंदापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निखील बाळासाहेब होले हे आपल्या क्रेटा गाडीतून प्रवास करत असताना, पाठीमागून येणाऱ्या काळ्या रंगाच्या टोयोटा फॉर्च्युनरने (एम.एच. 42 बी.एस. 0111) जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, क्रेटा गाडी पुढे असलेल्या मारुती व्हॅगनरवर आदळली. त्यामुळे तीनही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune : परिक्षेला निघालेल्या विद्यार्थीनीला मारूती अल्टोची धडक, तरूणी 6 ते 7 फुट उंचावर उडाली, अपघाताचा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल