महापालिकेला पुणेकरांना पुरेसे पाणी देण्याचे आव्हान
पुणे शहराला पाणी पुरवठा खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातून 11.50 टीएमसी, पवना धरणातून 0.34 टीएमसी आणि भामा-आसखेड जलाशयातून 2.67 टीएमसी इतका देण्यात आला आहे. महापालिकेने 2024-25 मध्ये एकूण 22 टीएमसी पाणी वापरल्याची माहिती दिली आहे. त्यात खडकवासला धरणातून 19.75 टीएमसी, पवना धरणातून 0.36 टीएमसी आणि भामा-आसखेड धरणातून 1.90 टीएमसी पाणी वापरण्यात आले.
advertisement
सध्या खडकवासला धरणाची एकूण साठवण क्षमता 29.50 टीएमसी आहे. मागील वर्षी शेतीसाठी तीन टप्प्यांमध्ये एकूण 15 टीएमसी पाणी वापरले गेले. त्यामुळे पुणेकरांचा वर्षभरचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे महापालिकेसाठी मोठं आव्हान ठरणार आहे. पाटबंधारे विभागाने पाण्याचे अंदाजपत्रक मंजूर करताना खडकवासला येथील महापालिकेच्या पाणी उपसा केंद्रावर नियंत्रण घेण्याची मागणी केली आहे.