छत्रपती संभाजीनगर : आपल्यापैकी अनेकांच्या आहारामध्ये मनुक्याचा समावेश असेल. सुक्या मेव्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे मनुका आहे. मनुका हा शिरा, लाडू तसेच इतरही माध्यमातून लोक खातात. पण मनुकाचे पाणी पिण्याचे अनेक असे फायदे होतात. तर यामुळे नेमका काय फायदा होतो, कोणत्या माध्यमातून हे पाणी घ्यावे याचबाबत आपण जाणून घेऊयात.