रोहित पवार युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून युवकांना साद घालणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर बहुतेक नेत्यांनी अजित पवार गटाची वाट धरलीय. त्यामुळे शरद पवार गटात नेतृत्वाची वाणवा आहे. या पार्श्वभूमीवर संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आपलं नेतृत्व प्रस्थापित करण्याचा रोहित पवार प्रयत्न असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.