ताशी 120-125 किमी वेगानं चक्रीवादळं ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकलं आहे. अति मुसळधार पाऊस आणि विध्वंसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, कुठे घरांचे दुकानाचे पत्रे उडाले तर काही घरांमध्ये पाणीही शिरलं आहे.समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावांमध्ये महापुराची स्थिती निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. अखेर चक्रीवादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकलं आहे.दाना चक्रीवादळामुळे रेल्वेचीही दाणादाण उडाली आहे.