पुणे: पुण्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे मोठा अपघात झाला आहे. इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला असून या घटनेनं एकच खळबळ उडवली आहे. इंद्रायणी नदीवरील पूल वाहून गेल्याने 20 ते 25 पर्यटकही वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे. आतापर्यंत सहा पर्यटकांच्या मृत्यूची बातमी आहे. अद्याप आकडा अधिकृतरित्या सांगतिला नाही. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.