सोलापूरात पावसाने थैमान घातले आहे. बऱ्याच ठिकाणी ढगफूटी सदृश्य पाऊस पडून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच एका पुलावर पाणी आले होते. अति आत्मविश्वासात रिक्षा चालकाने आपली रिक्षा पुढे नेली. पण, त्याच वेळी रिक्षा एका खड्ड्यात अडकली. या विचित्र घटनेत रिक्षा चालक वाहून गेला.