Gemology: मेष राशीच्या लोकांनी बिनधास्त घालायचं हे रत्न; चांगले परिणाम काही दिवसात दिसू लागतात
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Gemology: मेष राशीची माणसं खूप ऊर्जावान आणि उत्साही असतात. ते नेहमी नवीन गोष्टी करण्यासाठी तयार राहतात. पण त्यांच्यामध्ये काहीसा उतावळेपणा दिसून येतो. कोणताही निर्णय घेताना ते अनेकदा विचार न करता घाई करतात, यासाठी त्यांच्यासाठी शुभ रत्नाविषयी जाणून घेऊ.
मुंबई : राशीचक्रातील पहिली रास म्हणजे मेष, मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे, ज्यामुळे या राशीच्या व्यक्तींमध्ये धैर्य, ऊर्जा आणि नेतृत्वाचे गुण दिसून येतात. मेष राशीचे लोक उत्साही, महत्त्वाकांक्षी आणि धाडसी असतात. त्यांच्यामध्ये उपजत नेतृत्व क्षमता असते आणि ते कोणतेही काम स्वतःच्या हातात घेण्यास घाबरत नाहीत.
मेष राशीची माणसं खूप ऊर्जावान आणि उत्साही असतात. ते नेहमी नवीन गोष्टी करण्यासाठी तयार राहतात. पण त्यांच्यामध्ये काहीसा उतावळेपणा दिसून येतो. कोणताही निर्णय घेताना ते अनेकदा विचार न करता घाई करतात, याचा फटकाही त्यांना आयुष्यात सोसावा लागतो. ते मनाने स्पष्ट असतात आणि त्यांना मनात काहीही ठेवायला आवडत नाही. यामुळे काहीवेळा त्यांच्या बोलण्यातून कठोरपणा दिसू शकतो. त्यांना स्वतःच्या पद्धतीनं जगायला आवडतं, त्यांना दुसऱ्यांच्या नियंत्रणात राहणं आवडत नाही.
advertisement
मेष राशीसाठी शुभ रत्न कोणतं?
मेष राशीच्या लोकांसाठी पोवळे (Red Coral) हे रत्न सर्वात शुभ मानले जाते. पोवळे हे मंगळ ग्रहाचे रत्न असून ते मेष राशीच्या लोकांना लाभदायी मानले जाते. पोवळे रत्न धारण केल्यानं आत्मविश्वास, धैर्य आणि साहस वाढते. हे रत्न रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास आणि शारीरिक ऊर्जा वाढवण्यास मदत करते. पोवळं रत्न मंगळवारी सकाळी सोन्याच्या किंवा तांब्याच्या अंगठीत जडवून उजव्या हाताच्या अनामिकेत घालावे. त्यामुळे त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. पण, कोणतंही रत्न धारण करण्यापूर्वी आपल्या कुंडलीनुसार आणि ग्रहांच्या स्थितीनुसार योग्य ज्योतिषाचा सल्ला घेणे योग्य ठरेल.
advertisement
पोवळे/प्रवाळ रत्न धारण करण्याचे फायदे -
मेष राशीचा स्वभाव साहसी आणि निर्भीड असतो. पोवळे हे धैर्य आणि आत्मविश्वास वाढवण्यास मदत करते. त्यामुळे नेतृत्वाची क्षमता सुधारते. हे रत्न मंगळ ग्रहाच्या ऊर्जेशी जोडलेले असल्याने, ते शरीरात सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह निर्माण करते. यामुळे आळस कमी होतो आणि कामामध्ये अधिक सक्रियता येते. पोवळे धारण केल्याने रक्ताशी संबंधित आजार, त्वचेच्या समस्या आणि इतर शारीरिक वेदना कमी होण्यास मदत होते, असे मानले जाते. हे रत्न धारण केल्याने शत्रूंवर विजय मिळवण्याची शक्ती मिळते, असे म्हटले जाते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 10, 2025 7:26 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Gemology: मेष राशीच्या लोकांनी बिनधास्त घालायचं हे रत्न; चांगले परिणाम काही दिवसात दिसू लागतात