Shravan 2025: श्रावण महिन्यात ब्रह्ममुहूर्तावर या मंत्रांचा जप करणं शुभफळदायी, भोलेनाथ लगेच पावतात

Last Updated:

Shravan 2025: शिवपुराणानुसार सकाळी उठताच महादेवाचं स्मरण केलं तर व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या आणि त्रास दूर होऊ शकतात. यासाठी श्रावणात दररोज सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून आणि भगवान शिवाच्या ११ नावांचा जप करावा.

News18
News18
मुंबई : श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार वर्षातील पाचवा महिना असून, तो मराठी महिन्यांनुसार आषाढ महिन्यानंतर येतो. हा महिना विशेषतः महाराष्ट्रात धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना साधारणपणे जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात येत असतो. यंदाही जुलै-ऑगस्ट या महिन्यांमध्ये श्रावण असेल.
शिवपुराणानुसार, सकाळी उठताच महादेवाचं स्मरण केलं तर व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या आणि त्रास दूर होऊ शकतात. यासाठी श्रावणात दररोज सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून आणि भगवान शिवाच्या ११ नावांचा जप करावा. असं केल्यानं व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. ब्रह्म मुहूर्ताची वेळ पहाटे ४ ते ५:३० पर्यंत असते.
शंभू महादेवाची ११ नावे -
advertisement
ब्रह्म मुहूर्तात भगवान शिवाच्या ११ विशेष नावांचा जप केल्याने जीवनातील प्रत्येक दुःख आणि वेदना संपू शकतात. महादेवाची ११ नावे आहेत - पिनाकी, कपाली, भीम, शंभू, चंड, पिंगल, विलोहित, भव, विरुपाक्ष, शास्ता आणि अर्पिनर्बुध्य.
महादेवाची ही नावे चमत्कारिक आहेत -
शिवपुराणानुसार, शंकराच्या या ११ नावांचा जप केल्यानं चमत्कारिक परिणाम मिळतात. म्हणून दररोज सकाळी उठल्यावर हात जोडून बसा आणि भगवान शंकराचे स्मरण करताना त्यांचे नामस्मरण करा. जर तुम्हाला शिवाचे मंत्र जप करायचे असतील तर स्नान केल्यानंतर, स्वच्छ कपडे घालून पंचाक्षरी मंत्र, शंकराचा गायत्री मंत्र इत्यादींचा जप करा. मंत्र जप करण्यासाठी व्यक्ती शुद्ध अवस्थेत असणे आवश्यक आहे. माळेने जप करत असाल तर रुद्राक्ष माळ वापरा कारण रुद्राक्ष माळेने शिव मंत्र जप करणे अधिक फायदेशीर आहे.
advertisement
१. पंचाक्षरी मंत्र:
ॐ नमः शिवाय (Om Namah Shivaya)
हा सर्वात मूलभूत आणि शक्तिशाली शिव मंत्र आहे. 'ॐ' हे संपूर्ण ब्रह्मांडाचे प्रतीक आहे, 'नमः' म्हणजे नमन करणे आणि 'शिवाय' म्हणजे भगवान शिवाला. याचा अर्थ 'मी भगवान शिवाला नमन करतो'. हा मंत्र सर्व पापांचा नाश करतो आणि मोक्ष प्रदान करतो असे मानले जाते.
advertisement
२. महामृत्युंजय मंत्र:
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥
हा मंत्र दीर्घायुष्य, आरोग्य आणि मृत्यूच्या भीतीपासून मुक्तीसाठी जपला जातो. हा शिवशंकराला समर्पित असलेला एक अत्यंत शक्तिशाली मंत्र आहे, जो व्यक्तीला अनेक संकटांमधून बाहेर काढतो असे मानले जाते.
advertisement
३. रुद्र गायत्री मंत्र:
ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि।
तन्नो रुद्रः प्रचोदयात्॥
हा मंत्र भगवान शिवाच्या रुद्रावतारला समर्पित आहे. हा मंत्र ज्ञान, बुद्धी आणि आध्यात्मिक जागृतीसाठी जपला जातो. याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मन शांत राहते. 
advertisement
४. शिव ध्यान मंत्र:
करचरण कृतं वाक्कायजं कर्मजं वा।
श्रवणनयनजं वा मानसं वाऽपराधम्।
विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व।
जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शंभो॥
हा मंत्र शिवाची स्तुती करताना केलेल्या सर्व चुकांची क्षमा मागण्यासाठी आणि त्यांच्या कृपेसाठी जपला जातो. 
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shravan 2025: श्रावण महिन्यात ब्रह्ममुहूर्तावर या मंत्रांचा जप करणं शुभफळदायी, भोलेनाथ लगेच पावतात
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement