गाड्यांवर स्टिकर्स लावणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, वाहनांचे बदलले नियम, 'या' गाड्यांना बसाणार दंड
- Published by:Devika Shinde
Last Updated:
मोटार वाहन कायद्यांतर्गत आता गाड्यांवर अशा प्रकारे नाव लिहिण्याच्या पद्धतीला आता बेकायदेशीर ठरवण्यात आलं आहे.
मुंबई : आपण रस्त्यावर अनेकदा अशा गाड्या पाहिल्या असतील, ज्या गाडीवर 'मराठा', 'ब्राह्मण', 'मुस्लिम', 'सिंह', 'राजपूत' अशा जाती-धर्माशी संबंधित शब्द किंवा स्टिकर्स लावलेले असतात. काही जण गाडीवर रोमान्टिक किंवा वादग्रस्त कोट्सही लिहितात. तर काही लोक आपल्या गाड्यांवर घरातील लहान मुलांची नावं ही लिहितात, आधी हे चालून जात होतं, पण आता यासंबंधीत नियम बदलले आहेत. त्याअंतर्गत तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते.
मोटार वाहन कायद्यांतर्गत आता गाड्यांवर अशा प्रकारे नाव लिहिण्याच्या पद्धतीला आता बेकायदेशीर ठरवण्यात आलं आहे.
मोटर वाहन कायद्याचे नियम काय सांगतात?
मोटर वाहन (Motor Vehicle Act) कायद्यातील कलम 179(1) नुसार, जर कोणी आपल्या वाहनावर जात, धर्म किंवा कोणत्याही प्रकारचे वादग्रस्त स्टिकर लावले किंवा लिहिलं, तर त्याच्यावर 1000 रुपये पर्यंतचा दंड लागू शकतो.
advertisement
नंबर प्लेटबाबत काय नियम आहेत?
2023 पासून, हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवर कोणत्याही प्रकारची छेडछाड, जात-धर्माशी संबंधित मजकूर लिहिणं किंवा स्टिकर लावणं गैरकायदेशीर आहे. यासाठी 5000 रुपये पर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो.
काय लिहू नये?
जात, धर्म, समुदायाशी संबंधित शब्द
कोणाच्याही भावना दुखावणारे कोट्स
अश्लील किंवा द्वेष पसरवणारी शायरी किंवा वाक्य
का केला गेला असा नियम?
हा नियम सामाजिक सलोखा, जातीय तणाव टाळणे आणि भेदभाव थांबवण्यासाठी लागू करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी जातीयतेचा प्रचार टाळण्यासाठी हे एक महत्त्वाचा पाऊल आहे.
advertisement
गाडीवर स्टिकर लावताना फॅशन आणि अभिमानापेक्षा कायदेशीर नियम पाळणे महत्त्वाचं आहे. अन्यथा शौकासाठी लावलेलं नाव तुमच्या खिशाला चांगलाच फटका मारु शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 09, 2025 7:25 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
गाड्यांवर स्टिकर्स लावणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, वाहनांचे बदलले नियम, 'या' गाड्यांना बसाणार दंड