सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, दहावी ते पदवीधर तरुणांसाठी मेगा भरती
- Published by:News18 Marathi
Last Updated:
दहावी उत्तीर्ण उमेदवारांपासून ते पदवीधर उमेदवारांपर्यंत सर्वजण सरकारी नोकरीसाठी अर्ज करू शकतात.
लातूर, 23 डिसेंबर: खरंतर सरकारी नोकरी म्हटले की, इच्छुक तरुण कोणत्याही भागात जाण्यास तयार असतात. त्यामुळे अशा तरुणांसाठी आता एक मेगा भरतीची संधी उपलब्ध झाली आहे. लातूर महानगरपालिकेत नुकतीच एक बंपर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष म्हणजे फक्त दहावी उत्तीर्ण उमेदवारांपासून ते पदवीधर उमेदवारांपर्यंत सर्वजण या लातूर महानगरपालिकेतर्फे घेण्यात येत असलेल्या भरती प्रक्रियेत अर्ज करू शकतात. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची गरज आहे.
लातूर महानगरपालिकेकडून घेण्यात येत असणाऱ्या या भरतीप्रक्रियेतील अर्ज स्वीकारण्यास 22 डिसेंबर पासून सुरुवात झालेली आहे. महानगरपालिकेतील विविध पदांसाठी ही भरती होत आहे. त्यामुळे शिक्षणाची अटही पदांनुसार कमी अधिक ठेवण्यात आली आहे. दहावी पास उमेदवारांना देखील या भरतीवेळी संधी मिळत आहे.
advertisement
कोणत्या पदांसाठी किती जागा ?
ही भरतीची प्रक्रिया लातूर महानगरपालिकेतील एकूण 80 रिक्त जागांसाठी पार पडत आहे. यामध्ये खालील प्रमाणे रिक्त जागा आहेत.
1) पर्यावरण संवर्धन अधिकारी : 1, 2) सिस्टीम मॅनेजर ई-प्रशासन : 1, 3) मनपा वैद्यकीय अधीक्षक : 1, 4) शाखा अभियंता : 2, 5) विधी अधिकारी : 1, 6) अग्निशमन केंद्र अधिकारी : 1, 7) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : 4, 8) कनिष्ठ अभियंता (पा/पु) : 4, 9) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) : 1, 10) कर अधीक्षक : 2, 11) औषधनिर्माता (फार्मसिस्ट) : 1, 12) सहाय्यक कर अधीक्षक : 4, 13) कर निरीक्षक : 4, 14) चालक यंत्रचालक : 9, 15) लिपिक टंकलेखक : 10, 16) फायरमॅन : 30, 17) व्हॉलमॅन : 4
advertisement
कधी आहे शेवटची तारीख..?
दिनांक 22 डिसेंबर रोजी ही भरती प्रक्रिया सुरू झाली असून दिनांक 14 जानेवारी 2024 रात्री 11.59 पर्यंतच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार आहे. इच्छुकांना या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या कोणत्याही कोणत्याही भागातून मुदतीआधीच सर्व अर्जदारांनी आपले अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.
advertisement
उमेदवारांनी काय घ्यावी काळजी?
इच्छुक उमेदवारांसाठी शैक्षणिक अहर्ता ही दहावीपासून ते पदवीपर्यंत उत्तीर्ण किंवा डिप्लोमाधारक असणे आवश्यक आहे. तसेच इच्छुक उमेदवार हा भारतीय नागरिक असायला हवा. त्याचबरोबर आपली सर्व आवश्यक कागदपत्रे उमेदवारांनी अर्जासोबत ऑनलाईन अपलोड करायची आहेत.
advertisement
कसा आणि कुठे करावा अर्ज?
लातूर महानगरपालिकेच्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. यासाठीची अधिक माहिती लातूर महानगरपालिकेच्या https://mclatur.org/recruitment/ या अधिकृत वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे. मात्र 14 जानेवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असल्याने इच्छुकांनी घाई करण्याची गरज आहे.
Location :
Latur,Maharashtra
First Published :
Dec 23, 2023 6:11 PM IST










