Crime News: आत्महत्या केलेल्या जावयाच्या विम्याच्या पैशांसाठी सासऱ्याचा निर्घृण खून, कुटुंबानेच केली क्रूर हत्या
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
Crime News: मथुराच्या छाता भागात एक धक्कादायक घटना घडली आहे, जिथे आत्महत्या केलेल्या जावयाच्या विम्याची कागदपत्रे घेण्यासाठी आलेल्या सासऱ्याचीच निर्दयीपणे हत्या करण्यात आली. कुटुंबीयांच्याच हातून घडलेल्या या हत्याकांडामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मथुरा : उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात एका सासऱ्याचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छाता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सबलगड येथे आपल्या दिवंगत जावयाच्या विम्याची कागदपत्रे घेण्यासाठी आलेले चंद्रपाल (वय 52) यांची त्याच्याच मुलीच्या सासरच्या मंडळींनी हत्या केल्याचा आरोप आहे.
काय घडले नेमके?
जैंत परिसरातील परखम गुर्जर गावातील रहिवासी चंद्रपाल आपल्या जावयाच्या मृत्यूनंतर त्याच्या विम्याची कागदपत्रे घेण्यासाठी गुरुवारी सबलगड येथे गेले होते. त्यांचा जावई लोकेशने एका महिन्यापूर्वी आत्महत्या केली होती. चंद्रपाल आपल्या मुलीच्या मदतीने विम्याची कागदपत्रे घेण्यासाठी आले असता त्याचा मोठा जावई सुनील आणि सासू कमलेश कुमारी तिथे आले.
advertisement
प्राणघातक हल्ला
सुनील आणि कमलेश कुमारी यांनी चंद्रपाल यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली आणि त्यांच्याशी उद्धट वर्तन केले. चंद्रपाल यांनी त्यांना विरोध केला असता सुनील आणि कमलेश कुमारी यांनी त्यांच्यावर धारदार ‘बांका’ (चारा कापण्यासाठी वापरला जाणारा धारदार शस्त्र) ने हल्ला केला. त्यांना सतत मारहाण केली. या मारहाणीत ते रक्तबंबाळ होऊन कोसळले.
advertisement
चंद्रपाल गंभीर जखमी अवस्थेत जमिनीवर पडले होते. घरच्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी आरोपींना अटक केली
चंद्रपाल यांच्या मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी सुनील आणि कमलेश कुमारी यांना अटक केली. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
advertisement
या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक पथक पाठवले असून, सर्व पुरावे गोळा करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 21, 2025 6:00 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Crime News: आत्महत्या केलेल्या जावयाच्या विम्याच्या पैशांसाठी सासऱ्याचा निर्घृण खून, कुटुंबानेच केली क्रूर हत्या