R. Madhavan: 'सिनेमाच्या नावाखाली मजा...' कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत रोमान्स करण्यावर आर.माधवन स्पष्टच बोलला
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
R. Madhavan: आर.माधवनलाही कमी वयाच्या अभिनेत्रीसोबत रोमान्स केल्यामुळे ट्रोल व्हावं लागलं आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया.
मुंबई : बॉलिवूडमध्ये नायक-नायिकेतील वयाच्या फरकावर नेहमीच चर्चा रंगत असते. अनेक ज्येष्ठ अभिनेते पडद्यावर तरुण अभिनेत्रींशी रोमान्स करताना दिसतात आणि त्यावर त्यांना ट्रोलही व्हावे लागते. अशातच आता आर.माधवनलाही कमी वयाच्या अभिनेत्रीसोबत रोमान्स केल्यामुळे ट्रोल व्हावं लागलं आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया.
नुकताच प्रदर्शित झालेला ‘आप जैसा कोई’ या चित्रपटात आर. माधवन आणि फातिमा सना शेख जोडी म्हणून दिसले. माधवन आता 50 वर्षांच्या आसपास आहे, तर फातिमा सना शेख वयाने त्यांच्यापेक्षा खूप लहान 33 वर्षांची आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या जोडीबद्दल चर्चा सुरू झाली.
advertisement
यावर माधवनने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत खुलेपणाने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “लोकांना अनेकदा वाटतं की अभिनेता तरुण नायिकेसोबत केवळ मजा घेतोय. त्यामुळे नायिका निवडताना खूप विचार करावा लागतो. प्रेक्षकांना जर त्या जोडीत नैसर्गिकता वाटली नाही तर ते त्या पात्राचा आदर करत नाहीत.”
माधवन पुढे म्हणाला की, वयाचा स्वीकार करणे महत्त्वाचे आहे.“तुमच्या मुलांचे मित्र तुम्हाला ‘काका’ म्हणायला लागतात, तेव्हा पहिल्यांदा तुमच्या वयाचा धक्का बसतो. मग तुम्ही हळूहळू ते स्वीकारता. माझं शरीर आता 22 वर्षांच्या तरुणासारखं नाही. त्यामुळे स्क्रिप्ट आणि नायिका निवडताना वास्तवता टिकवणे खूप गरजेचे आहे.”
advertisement
बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान यांसारखे अनेक स्टार्स तरुण अभिनेत्रींशी जोडी जमवताना दिसतात. त्यावर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. माधवन मात्र यातून वेगळं मत मांडतो. त्याच्या मते, अभिनय करताना केवळ रोमॅन्स दिसला तर त्याला गंभीरता राहत नाही. प्रेक्षकांचा विश्वास टिकवण्यासाठी वास्तव आणि पात्राशी जुळणारी जोडी महत्त्वाची आहे.
माधवनने दिलेली ही स्पष्टवक्ती प्रतिक्रिया सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. अनेकांनी त्याच्या प्रामाणिकतेचं कौतुक केलं आहे, तर काहींनी पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये वयाच्या तफावतीच्या जोड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 19, 2025 5:31 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
R. Madhavan: 'सिनेमाच्या नावाखाली मजा...' कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत रोमान्स करण्यावर आर.माधवन स्पष्टच बोलला