'कोणत्याही मुलीचे अंडरगार्मेंट्स...', बॉलिवूड अभिनेत्रीला शाळेत आलेला किळसवाणा अनुभव, वडील करायचे कपड्यांची खरेदी

Last Updated:

बॉलिवूड अभिनेत्री तिच्या दमदार अभिनयासोबतच रोखठोक आणि परखड विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते.

News18
News18
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या दमदार अभिनयासोबतच रोखठोक आणि परखड विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी स्वराने एका मुलाखतीत तिच्या शाळेतील दिवसांचा एक अत्यंत किळसवाणा आणि अस्वस्थ करणारा अनुभव शेअर केला होता, ज्यामुळे मुलींना एका विशिष्ट वयात कोणत्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते, हे सर्वांसमोर आले. यावेळी स्वरा भास्करने शाळेतील मुलांच्या गलिच्छ सवयीबद्दल बोलताना संताप व्यक्त केला.

मुलांकडून व्हायची 'त्या' गोष्टीची मोजणी

'हाउटरफ्लाई' सोबत बोलताना स्वरा भास्करने मुलींच्या आयुष्यातील एका नाजूक टप्प्याबद्दल सांगितले. स्वरा म्हणाली, "शाळेत जेव्हा मुली ११ वी-१२ वीत पोहोचतात, तेव्हा त्यांच्यात प्यूबर्टी सुरू होते. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात तो टप्पा येतो, जिथे ती बनियनसारख्या गंजीवरून स्पोर्ट्स ब्रा आणि नंतर नॉर्मल ब्राकडे वळते."
advertisement
स्वरा पुढे म्हणाली, "आमच्या वर्गातील मुलांना यात खूप मजा यायची. 'कोणत्या मुलीने बायकांसारखी ब्रा घालणे सुरू केले आहे', याची ते मोजणी करायचे." शाळेतील मुलांच्या या सवयीमुळे मुली कशा अस्वस्थ व्हायच्या, हेही स्वराने सांगितले.
"आणि आम्हा मुलींसाठी हे सर्वात महत्त्वाचे असायचे की, मुलांना आपण ब्रा घातल्याचे कळायला नको. त्यामुळे ब्रा घातल्यावरही वरून गंजी घालावी लागायची, आणि त्यात दिल्लीची भयानक गरमी!" असा अनुभव स्वराने सांगितला.
advertisement

वडील करायचे ब्राची खरेदी!

याच मुलाखतीत स्वराने महिलांसाठी अंतर्वस्त्रे खरेदी करणे किती लाजीरवाणे असायचे, हे सांगितले. स्वरा म्हणाली, "ब्रा च्या दुकानात नेहमी पुरुषच असायचे. मला कळत नाही, महिला त्या दुकानात का काम करत नाहीत? मला इतकी शरम वाटायची की, मी वडिलांना दुकानात पाठवायचे. मी त्यांना म्हणायचे की, मी खरेदीला जाणार नाही." स्वरा भास्करच्या या लाजिरवाण्या अनुभवामुळे समाजात, विशेषतः शालेय स्तरावर, मुलींच्या संवेदनशीलतेकडे कसे दुर्लक्ष केले जाते, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'कोणत्याही मुलीचे अंडरगार्मेंट्स...', बॉलिवूड अभिनेत्रीला शाळेत आलेला किळसवाणा अनुभव, वडील करायचे कपड्यांची खरेदी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement