"नेहरूंच्या काळात खूप मोठी चूक झाली..."; दिग्दर्शक प्रकाश झा यांचा तो व्हिडीओ चर्चेत

Last Updated:

5 सप्टेंबरला देशभरात शिक्षक दिन साजरा होत आहे यादिवशी दिग्दर्शक प्रकाश झा यांचं वक्तव्य चर्चेत आलं आहे. ते नेमकं काय म्हणालेत?

प्रकाश झा
प्रकाश झा
मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक प्रकाश झा नेहमीच त्याच्या कामामुळे चर्चेत राहिले आहेत. आजवर त्यांनी बॉलिवूडला अनेक हिट सिनेमे दिले आहेत. त्यांचे सिनेमे नेहमीच विचार करायला भाग पडतात. त्यांच्या सिनेमाप्रमाणे त्यांनी केलेल्या वक्तव्यानं सर्वांना विचार करायला भाग पाडलं आहे. 5 सप्टेंबरला देशभरात शिक्षक दिन साजरा होत आहे यादिवशी दिग्दर्शक प्रकाश झा यांचं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
प्रकाश झा यांच्या एका मुलाखतीत त्यांचं वक्तव्य चर्चेत आलं आहे. त्यांनी एका मुलाखतीत बोलताना शिक्षकांची आपल्या देशासाठी आणि तरुणांसाठी किती गरज आहे हे नमूद केलं. ते म्हणाले, नेहरूंच्या काळात खूप मोठी चूक झाली. IAS, IPSआणि IRSच्या आधी ITS बनवायला पाहिजे होते. इंडियन टिचिंग सर्विसेस. ही सगळ्यात मोठी चुक झाली, खूप मोठी चुक. सगळ्यात इंटेलिजेन्ट लोक जे आहेत ते तिथे जायला हवे होते. आजही देश सुधारेल.
advertisement
प्रकाश झा पुढे म्हणाले, " ITS ला IAS पेक्षा डबल सॅलरी दिली पाहिजे. त्यांना बंगले, गाडी दिली पाहिजे, सगळ्या प्रकारच्या सुविधा त्यांना द्यायला हव्यात. प्रकाश झा यांचा हा व्हिडीओ आणि त्यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
advertisement
प्रकाश झा यांच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं झाल्यास, 2005 साली आलेल्या अपहरण, 2011 साली आलेल्या आरक्षण आणि 2010 साली आलेला राजनिती हे त्यांचे सिनेमे खूप हिट झाले. प्रकाश झा हे सिनेक्षेत्रात कार्यरत असले तरी त्यांना राजकीय क्षेत्रातही विशेष रस आहे. 2004 साली त्यांनी चौदावी लोकसभा निवडणूक लढवली होती. पण त्यांना जनतेनं निवडून दिलं नाही.
मराठी बातम्या/मनोरंजन/
"नेहरूंच्या काळात खूप मोठी चूक झाली..."; दिग्दर्शक प्रकाश झा यांचा तो व्हिडीओ चर्चेत
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement