'मला आनंदी राहण्याचा हक्क' BF ने जबरदस्ती केलं ब्रेकअप, अभिनेत्री संतापली, लीक केले प्रायव्हेट चॅट्स!

Last Updated:

‘सेक्रेड गेम्स’ फेम अभिनेत्री तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरील पोस्टमुळे चर्चेत आहे. तिच्या प्रायव्हेट चॅट्सचा स्क्रीनशॉट शेअर करून नात्याच्या शेवटाबद्दल संकेत दिले आहेत.

‘सेक्रेड गेम्स’ फेम अभिनेत्री तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरील पोस्टमुळे चर्चेत आहे.
‘सेक्रेड गेम्स’ फेम अभिनेत्री तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरील पोस्टमुळे चर्चेत आहे.
मुंबई : वेबसीरीज ‘सेक्रेड गेम्स’, ‘तेहरान’ आणि ‘जुग जुग जियो’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री एलनाज नोरौजी सध्या एका भावनिक पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर नुकताच तिने एका गुप्त संवादाचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि त्यानंतर चर्चांना उधाण आलंय.
या स्क्रीनशॉटमध्ये एलनाज एका अनामिक व्यक्तीसोबत चॅट करताना दिसते. हे चॅट्स अत्यंत खासगी आणि भावनिक असून, त्यातून एका नात्याचा शेवट स्पष्टपणे सूचित होतो. “आपण हे नातं टिकवण्यासाठी खूप प्रयत्न केले” असं एलनाजने लिहिलं आहे. तर समोरची व्यक्ती उत्तर देते, “माहितीय, पण असं वाटतंय की आपण फक्त वर्तुळात फिरतोय... आणि हे नातं कोणालाही आनंद देत नाही.”
advertisement
या संवादातून एलनाजच्या मनातली अस्वस्थता आणि नात्याच्या शेवटावरचा तिचा विरोध स्पष्ट जाणवतो. “म्हणजे इतकं सगळं झाल्यावरही तू हार मानतो आहेस?” असं विचारणारी एलनाज, शेवटी स्वतःच म्हणते, “कदाचित हे माझं मूर्ख मन आहे…”
एलनाजने या व्यक्तीचं नाव जरी झाकलेलं असलं, तरी यूजर्सनी याचा संबंध तिच्या ‘कंधार’ सहकलाकार हॉलिवूड अभिनेता जेरार्ड बटलर याच्याशी लावला आहे. काही काळापूर्वी एलनाज आणि जेरार्डचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दोघंही एकत्र सुट्टीचा आनंद घेताना दिसत होते. त्यामुळे याआधीपासूनच त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलेलं होतं.
advertisement
advertisement
एलनाजने एका मुलाखतीत जेरार्डवर असलेल्या तिच्या 'क्रश'बाबत सांगितलं होतं, आणि त्याच्या साधेपणाचं कौतुकही केलं होतं. मात्र, दोघांनी याआधी कधीच त्यांच्या नात्याबाबत खुलासा केलेला नाही. त्यामुळे या इमोशनल पोस्टनंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे की खरंच एलनाजचं ब्रेकअप झालंय का?
सध्या एलनाजची पोस्ट सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत असून, यावर “हे ब्रेकअप नाही, वापरलं गेलंय!” किंवा “नेहमीच मुलींनाच त्रास होतो” अशा प्रकारचे कमेंट्स पाहायला मिळत आहेत. या सगळ्या प्रकरणात खरी गोष्ट काय आहे, हे एलनाजकडून अधिकृतपणे कधी उघड केलं जातंय, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
'मला आनंदी राहण्याचा हक्क' BF ने जबरदस्ती केलं ब्रेकअप, अभिनेत्री संतापली, लीक केले प्रायव्हेट चॅट्स!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement