Makarand Anaspure : 'लग्नात जे हुंडा घेतात ते नामर्दच...', मुलीच्या घरच्यांना लुटणाऱ्यांना मकरंद अनासपुरेंचे खडे बोल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या 'नाम फाउंडेशन'चे सहसंस्थापक मकरंद अनासपुरे यांनी अकोल्यातील एका जाहीर सभेत हुंडा प्रथेवर आणि शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर अत्यंत परखड मत मांडले आहे.
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील संवेदनशील अभिनेता आणि शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या 'नाम फाउंडेशन'चे सहसंस्थापक मकरंद अनासपुरे यांनी अकोल्यातील एका जाहीर सभेत हुंडा प्रथेवर आणि शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर अत्यंत परखड मत मांडले आहे. "हुंडा घेणारे नामर्द आहेत!" अशा शब्दांत त्यांनी हुंडा घेणाऱ्यांना सुनावले. बाळापूर तालुक्यातील निंबा फाटा येथे आयोजित कुणबी स्नेहमिलन सोहळ्याच्या सभेत ते बोलत होते.
मकरंद अनासपुरे यांचा थेट सवाल
मकरंद अनासपुरे यांनी हुंडा प्रथेवर भाष्य करताना थेट सवाल केला. ते म्हणाले, "स्त्री जर टिकली नाही, तर समाज कसा टिकेल?" हा प्रश्न समाजाने अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. अनासपुरे यांचे हे मत त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे आणि स्त्री सन्मानाबद्दलच्या भूमिकेचे दर्शन घडवते.
advertisement
सोन्याचा भाव लाखांवर, मग कापसाला हा भाव का?
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना मकरंद अनासपुरे यांनी देशातील शेतकऱ्यांच्या विखुरलेल्या अवस्थेवर बोट ठेवले. "देशात शेतकरी एकत्र आल्याशिवाय त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत," असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. सध्या कापूस आणि सोन्याच्या भावातील मोठी तफावत दर्शवत त्यांनी व्यवस्थेला जाब विचारला. ते म्हणाले, "जर सोन्याचे भाव लाखाच्या वर गेले असतील, तर कापसाला भाव आणखीनही कमी कसा?" शेतकऱ्यांना उद्योजकांचा दर्जा का मिळत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
advertisement
'नाम'च्या भूमिकेतून बँकांना आवाहन
शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहत अनासपुरे यांनी बँका आणि वित्तसंस्थांना भावनिक आवाहन केले. शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात, बँका, पतसंस्था आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून कर वसूल करू नये, असे ते म्हणाले.
यावेळी अभिनेत्री गिरिजा ओक देखील उपस्थित होत्या. त्यांनीही सध्याच्या कठीण परिस्थितीत सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. नाना पाटेकर यांच्यासोबत 'नाम फाउंडेशन'ची स्थापना करून अनासपुरे यांनी अनेक सामाजिक विषयांवर नेहमीच प्रभावीपणे भाष्य केले आहे. निंबा फाटा येथील त्यांचे हे विचार त्यांच्या संवेदनशील आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाची साक्ष देतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 12, 2025 9:42 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Makarand Anaspure : 'लग्नात जे हुंडा घेतात ते नामर्दच...', मुलीच्या घरच्यांना लुटणाऱ्यांना मकरंद अनासपुरेंचे खडे बोल