पार्किंगवरून वाद, प्रसिद्ध TV अभिनेत्याच्या डोक्यात घातला रॉड, गोरेगावच्या सोसायटीतील थरार, VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
गोरेगावच्या सोसायटीमधील थरार कॅमेरात कैद केला आहे. अभिनेत्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. सोसायटीत पार्किंगच्या वादावरून एका व्यक्तीनं प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला मारहाण केली आहे. अभिनेत्याच्या डोक्यात रॉड घातला. इतकंच नाही तर अभिनेत्याच्या पाळीव कुत्र्याला देखील मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अभिनेत्यानं गोरेगावच्या सोसायटीमधील हा थरार कॅमेरात कैद केला आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे.
मुंबईच्या गोरेगाव वेस्ट परिसरात राहणारा प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अनुज सचदेवा याच्यावर त्याच्याच सोसायटीत हल्ला झाल्याचा गंभीर आरोप त्याने केला आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ अनुजने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
अनुजने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सोसायटीतीलच एक रहिवासी त्याला अश्लील शिवीगाळ करताना, काठीने आणि रॉडने वारंवार मारहाण करताना दिसत आहे. इतकंच नाही तर त्या व्यक्तीकडून अभिनेत्याला जिवे मारण्याची धमकी देखील दिल्याचं व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे.
सोसायटीच्या पार्किंगमध्ये चुकीच्या ठिकाणी कार उभी केल्यानं हे भांडण झालं. अनुजने सोसायटीच्या ग्रुपवर याबाबत सूचना दिल्याचा राग धरून संबंधित व्यक्तीने हा हिंसक प्रकार केल्याचा आरोप अनुजने केला आहे.
advertisement
अनुजच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोराने केवळ त्याच्यावरच नव्हे तर त्याच्या कुत्र्यावरही रॉडने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. सोसायटीतील सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही त्या व्यक्तीने अर्जुनवर हल्ला केला. त्याच्या डोक्यात रॉड घातला ज्यामुळे डोक्यातून रक्त वाहू लागलं.
advertisement
हा व्हिडीओ शेअर करताना अनुजने लिहिलं, "माझ्यावर हल्ला करण्यात आला आहे. मला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हr व्यक्ती माझं किंवा माझ्या मालमत्तेचं काही नुकसान करण्याचा प्रयत्न करण्याआधीच हा पुरावा मी शेअर करत आहे. सोसायटीच्या ग्रुपवर चुकीच्या ठिकाणी कार पार्क केल्याची माहिती मी दिल्यामुळे त्याने माझ्या कुत्र्यावर आणि माझ्यावर लोखंडी रॉडने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. हार्मनी मॉल रेसिडेन्सी, गोरेगाव वेस्ट येथे ही घटना घडली आहे. हा व्यक्ती A विंग, फ्लॅट नंबर 602 मधील रहिवासी आहे. कृपया ज्यांच्याकडे कारवाई करण्याची क्षमता आहे अशा लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. माझ्या डोक्यातून रक्त येत आहे".
advertisement
या प्रकरणात अनुजने संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून अनेक कलाकार आणि चाहत्यांनी अनुजला पाठिंबा दिला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 15, 2025 1:43 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
पार्किंगवरून वाद, प्रसिद्ध TV अभिनेत्याच्या डोक्यात घातला रॉड, गोरेगावच्या सोसायटीतील थरार, VIDEO







