Things to Avoid with Ghee: तुपासोबत चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ; फायद्यांऐवजी होतील तोटे, आरोग्यालाही निर्माण होईल धोका

Last Updated:

Things to Avoid with Ghee: तूप कशाबरोबर खावं यालाही काही नियम आहे. योग्य त्या पदार्थांसोबत तूप घेतलं तर फायदा होईल. मात्र चुकीच्या पदार्थांसोबत तूप घेतलं तर प्रचंड नुकसान होऊ शकतं.

प्रतिकात्मक फोटो : तुपासोबत चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ; फायद्यांऐवजी होतील तोटे, आरोग्यालाही निर्माण होईल धोका
प्रतिकात्मक फोटो : तुपासोबत चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ; फायद्यांऐवजी होतील तोटे, आरोग्यालाही निर्माण होईल धोका
मुंबई: जेवण बनवताना किंवा तयार केलेले अन्नपदार्थ खाताना ते तुपासोबत खाण्याची परंपरा आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे. मग अगदी वरणभातावर घेतलेली साजूक तुपाची धार असो की पुरणपोळीवर घेतलेलं तूप असो. तुपाच्या औषधी गुणधर्मांमुळे ते आरोग्यासाठी फायद्याचं मानलं जातं. तुपामुळे शरीराला ऊर्जेसोबतच त्वचेला आर्द्रताही मिळते. तुपात असलेल्या पोषक तत्वांमुळे अन्न पचायला मदत होवून पचनसंस्थेचं आरोग्य सुधारतं. मात्र तूप कशाबरोबर खावं यालाही काही नियम आहे. योग्य त्या पदार्थांसोबत तूप घेतलं तर फायदा होईल. मात्र चुकीच्या पदार्थांसोबत तूप घेतलं तर प्रचंड नुकसान होऊ शकतं.
मध :
आयुर्वेदानुसार, मध आणि तूप कधीही एकत्र मिसळू नये. जर तुम्ही मध असलेलं अन्न  खात असाल तर त्यावर तूप घेणं टाळा. मध आणि तूप एकत्र केल्यामुळे एक विचित्र संयुग निर्माण होतं, ज्याचा विपरीत परिणाम पचनसंस्थेवर होतो ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे मध आणि तूप एकत्र करून खाणं टाळावं.
advertisement
मासे:
तेलात फॅट्स जास्त असतात ज्यामुळे कोलेस्टेरॉल वाढायला मदत होते. म्हणून काही जण मासे तळताना तेलाऐवजी तुपाचा वापर करतात. मात्र असं करणं आरोग्यासाठी धोक्याचं आहे. कारण मासे हे पचायला जड आणि तेलकट असतात त्यात ते तुपासोबत खाल्ल्याने पचनसंस्थेवर जास्त ताण येतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही मांसाहार करत असता अशा वेळी तूप खाणं टाळावं.
advertisement
मुळा:
मुळा आणि तूप हे सुद्धा एक विचित्र मिश्रण आहे.  कारण मुळा हा पचायला हलका आहे. तर तूप पचायला जड असतं. त्यामुळे तूप खाल्ल्यामुळे पचनक्रिया मंदावते. अशावेळी दोन्हीचे एकत्र खाल्ल्यास पचनक्रियेत गडबड होऊन गॅसेस, अपचन, पोटदुखी किंवा पोटफुगी सारखे आजार उद्भवू शकतात.
advertisement
गरम पाणी :
तुपासोबत गरम पाण्याचं सेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. गरम पाण्यात तूप मिसळून प्यायल्यास ते पचनसंस्थेसाठी त्रासदायक ठरतं.ज्यामुळे शरीरिक असंतुलन निर्माण होऊ शकतं. गरम पाणी तूप लवकर पचू देत नाही आणि त्यामुळे शरीरात जास्त उष्णता निर्माण होते, ज्यामुळे पोटात जळजळ होऊन ॲसिडिटीचा त्रास वाढू शकतो.
त्यामुळे योग्य त्या पदार्थांसोबत तूप खाल्ल्यास तुपाचे आरोग्यदायी फायदे तुमच्या शरीराला होतील.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Things to Avoid with Ghee: तुपासोबत चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ; फायद्यांऐवजी होतील तोटे, आरोग्यालाही निर्माण होईल धोका
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement